शेतकऱ्यांच्याप्रती सरपंच अमोल गोरे यांनी व्यक्त केली कृतज्ञता
जनुना(वार्ताहर): आधीच कोरोनामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले.त्यात आता शेतकऱ्यांनी पेरणी करूनही पावसाने दडी मारल्याने कित्येक पेरण्या खोळंबल्या, तर बियाण्यांनी दगा दिल्याने दुबार पेरणीचे संकटही ओढावले. अशा परिस्थितीत पुन्हा न डगमगता जोमाने कामाला लागणाऱ्या शेतकऱ्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत अन्नदात्याच्या शेतात जाऊन सरपंच अमोल गोरे यांनी सम्मान केला.
देशावर कोरोना महामारीचे संकट ओढावले आहे. कोरोणामुळे सर्वच हवालदिल झाले आहेत.कोरोना योध्यांबरोबरच जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरीवर्ग देखील राब राब राबत आज सर्वाची भूक भागवत आहे. कोरोनामुळे जेव्हा पूर्ण जग थांबले,अश्या परिस्थितीत सुद्धा शेतकरी शेतात राबत होता.अशा शेतकऱ्याच्याप्रती आपुलकीची भावना जोपासत एक छोटासा का होई ना , कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न येथील ग्रामपंचायत सरपंच अमोल गोरे यांनी केला.गावाबाहेरील शेतावर जाऊन पेरणी करणाऱ्या शेतकरी बांधवांना शाल,टोपी,हार घालून त्यांचा सन्मान केला. त्यांच्या बरोबर राबणाऱ्या बैल जोडीची देखील पूजा केली. तर स्वतः सरपंच अमोल गोरे यांनी काही वेळ शेतकऱ्यांच्या सोबत शेतात पेरणी केली. यांत्रिकीकरनामुळे शेतीची करण्याची पद्धत बदलत आहे.मात्र यावर्षी कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी शेतीची सध्या जुनीच पद्धत वापरत आहेत..