Home Breaking News माध्यमांची मुस्कटदाबी थांबवा !

माध्यमांची मुस्कटदाबी थांबवा !

143

 

अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व खामगाव प्रेस कलब खामगाव चे वतीने तहसीलदार श्री.शितल रसाळ साहेब यांना निवेदन.

खामगाव-अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व खामगाव प्रेस कलब खामगाव यांच्या वतीने आज औरंगाबाद येथील संपादक व टीम वरील नाहकचे दाखल गुन्हे तत्काळ मागे घ्या व माध्यमांची मुसकुटदाबी थांबवा अशा आशयाचे निवेदन तहसीलदार खामगाव यांना देण्यात आले. याबाबत असे कि,औरंगाबादेत कोरोनानं नुसतं थैमान घातलं आहे.कोरोना रोखायला जिल्हा प्रशासन पूर्णतः असफल ठरलं आहे.आपल्या अपयशाचं खापर जिल्हा प्रशासन आता माध्यमांवर फोडायला लागलं आहे.त्याचाच एक भाग म्हणून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न औरंगाबाद प्रशासनाकडून होत आहे.
दीव्य मराठीमध्ये ‘206 नागरिकांचे मारेकरी कोण” ? “नापासांची फौज: निर्णय घेण्यास कोण कुठे चुकले” ? अशा मथळ्याखाली दोन बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या.बातम्या चुकीच्या असल्याचं कारण सांगत दीव्य मराठीचे संपादक,प्रकाशक आणि संबंधित वार्ताहराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महामारीच्या काळात वास्तव जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी केलं आहे.अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील माध्यमांचं कौतूक केलेलं आहे.औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरलं आहे हे सत्य माध्यमांनी मांडायचं नाही का ? हा प्रश्‍न आहे.जिल्हा प्रशासन नापास झालेलं नसेल तर मृतांचा आकडा आणि बाधितांची संख्या सातत्यानं कशी वाढत चालली आहे ? याचाही खुलासा जिल्हा प्रशासनानं केला पाहिजे.माध्यमं जनतेचा आवाज असतात .हा आवाज कोणीही बंद करू शकत नाही.माध्यमांवर गुन्हे दाखल केल्यानं जिल्हा प्रशासनाचे अपयश झाकले जाईल असं कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.वास्तवात माध्यमांना बरोबर घेऊन महामारीचा मुकाबला करण्याची भूमिका प्रशासनानं घेणं अपेक्षित असताना माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे.आम्ही या घटनेचा निषेध करून या विषयांवर मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहे अशी प्रतिक्रिया खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री.कीशोरभाऊ भोसले,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री.योगेशभाऊ हजारे यांनी व्यक्त केली आहे.याप्रसंगी तहसीलदार खामगाव यांना आज दुपारी निवेदन देण्यात आले. यावेळी खामगाव येथील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.