खामगाव : जागतिक वायदे बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यानंतर भारतात देखील सोने व चांदीच्या किमतीत घट झाली आहे. दिल्ली सराफा येथे सोन्याच्या किमती 263 रुपयांनी कमी होत 48,861 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले आहे. चांदीची किंमत 806 रुपयांनी घसरली असून ती 66,032 रुपये प्रती किलो झाली आहे.
गेल्या तीन दिवसापासून सोन्याच्या किमती वाढत होत्या. एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी म्हटले आहे की जागतिक वायदे बाजारासोबत भारतीय वायदे बाजारात देखील सोन्याच्या किमतीत घट झाल्यामुळे स्पॉट मार्केटमधील सोन्याचे भाव कमी झाले आहे.
जागतिक बाजारात सोन्याचे भाव चे दर 1,861 डॉलर प्रति औंस व चांदीचे भाव 25.52 डॉलर प्रती औंस असे झाले. सोन्याचे भाव 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यानंतर दिर्घ कालावधीतील गुंतवणूकदारांसाठी सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
सोने गुंतवणूक फायदेशीर
आपण भारतीय लोक सोने नेहमीच खरेदी करीत असतो. लग्न कार्यासाठी, सणावाराला, वाढदिवसाला भेट देण्यासाठी शिवाय अक्षय्य तृतीया, धनत्रयोदशी असे साडेतीन मुहूर्त आहेतच. सोने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करीत असतो.
सोने हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय असून आता खरेदी केली तर भविष्यात नक्कीच फायदेशीर राहील. आता सोने चांदि खरेदी करीता भावाचि पोजिशन चांगलीच आहे या दोन महिन्यात सोने चांदि खरेदी करीता उत्तम संधी आहे सोने भाव 58000 रू पर्यंत व चांदीचे भाव 75000रू होणार हे भाकीत आहे .
-अनंतराव उंबरकर
श्री महालक्ष्मी अलंकार केंद्र नांदुरा