Home Breaking News खुश खबर, ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार २६ जानेवारीच्या आत कृषीपंपासाठी वीज कनेक्शन!

खुश खबर, ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार २६ जानेवारीच्या आत कृषीपंपासाठी वीज कनेक्शन!

81

माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतली कार्यकारी अभियंता यांची भेट

खामगाव : शेतकऱ्यांना वीज कंपनी बाबत असलेल्या विविध समस्यांसंदर्भात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता ब्रदीनाथ जायभाये यांची महावितरण कार्यालयात जाउन भेट घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करतांना सानंदा यांनी सांगितले की, राज्याचे उर्जामंत्री नितीन राउत यांनी वीज खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या सर्व अनाधिकृत कृशी पंप वीज जोडण्यांची २६ जानेवारीपर्यंत अधिकृतपणे जोडणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे महावितरणने अशा कृषी पंपाची लवकरात लवकर अधिकृत वीज जोडणी करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा व जो अधिकारी,कंत्राटदार वीज जोडणीमध्ये हलगर्जीपणा करत असेल त्याची मंत्रीमहोदयांकडे तक्रार करुन त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिला.
बैठकीदरम्यान माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी शेतक-यांच्या महावितरण संबंधी असलेल्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. कृषीपंपांना योग्य दाबाचा पुरवठा मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.ज्या गावातील विद्युत रोहित्र जळाले असेल तेथे तात्काळ नवीन रोहित्र बसविण्यात यावे, कोरोनामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला आहे म्हणुन ज्या शेतकऱ्यांकडे वीज बील थकित असेल त्यांना महावितरणकडुन वीजबील भरण्याकरीता सवलत देण्यात यावी,थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांचे वीज कनेक्षन कापण्यात येवु नये तसेच महावितरणच्या अधिकारी,कर्मचारी वर्गाकडून शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी, वीज ग्राहकांचे समाधान करण्यासाठी महावितरणने तत्पर रहावे अशी सुचना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी कार्यकारी अभियंता ब्रदीनाथ जायभाये यांना केली. यावेळी तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ.सदानंद धनोकार,नगरसेवक किषोरआप्पा भोसले, माजी जि.प.सदस्य सुरेषसिंह तोमर, बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबरावदादा देषमुख, मनोज वानखडे, शिवाजीराव पांढरे, निलेष देशमुख यांच्यासह महावितरणचे सहायक अभियंता आनंद देव,लेखापाल श्री वाघाळकर यांच्यासह महावितरणचे अधिकारी व खाते प्रमुख उपस्थित होते.