Home Breaking News आ. डॉ. कुटे यांच्या नेतृत्वात वीज कार्यलयाला ताला ठोको आंदोलन

आ. डॉ. कुटे यांच्या नेतृत्वात वीज कार्यलयाला ताला ठोको आंदोलन

76

जळगाव जामोद (राहुल निर्मळ):-
कोरोना च्या काळात महाराष्ट्र राज्यातील जनते ला वीज बिल माफी देण्यात येईल अशी घोषणा ऊर्जा मंत्री यांनी केली होती परंतु या घोषणेनंतर आता आपल्या निर्णयावर यु टर्न घेत 78 लाख ग्राहक नागरिकांना विज बिल भरण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या या निर्णयाच्या विरोधात आज राज्यभरात भाजपच्या वीज वितरण कार्यालयात ताळे ठोक आंदोलन करण्यात येत आहे त्यानुसार जळगाव जामोद येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ डॉ संजय कुटे यांच्या नेतृवात जळगाव जामोद वीज वितरण कार्यालयाला ताळा ठोकण्यात आला. वीज कनेक्शन तोडण्यास जर कोणी कर्मचारी गावात आल्यास भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी त्याला जाब विचारून योग्य ते सहकार्य नागरिकांना करावे असे आव्हान आ डॉ संजय कुटे यांनी केले. आपली लढाई ही राज्य शासनाच्या विरोधात असून जो पर्यंत मंत्र्यांनी स्वताच घोषित केल्या प्रमाणे वीज बिल माफी होत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. येत्या अधिवेशनात सुद्धा याबाबत सरकार ला जाब विचारण्याचे काम भारतीय जनता पार्टी करणार आहे असे हे ते यावेळी म्हणाले. हे आंदोलन सकाळी 12 वाजता सुरू करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी वीजबिल।माफी झालीच पाहिजे अश्या घोषणा देत बुऱ्हाणपूर चौकात च रास्ता रोको केला आणि त्यानंतर जाब विचारण्यासाठी वीज कार्यालयात धाव घेतली. आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक आणि भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते,पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आ डॉ संजय कुटे, नगराध्यक्षा सीमाताई कैलास डोबे, जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर अग्रवाल, गुणवंत कपले,रवींद्रसेठ ढोकने, युवा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत, जिल्हापरिषद सदस्य बंडू पाटील, माजी जीप सभापती राजेंद्र उमाळे, मंजुषा तिवारी पंचायत समिती सभापती ठाकरे ताई, उपसभापती रामेश्वर राऊत, एकनाथ वानरे, राजेंद्र गांधी,चंद्रकांत वाघ, समाधान दामधर, डॉ प्रकाश बगाडे, नगरसेविका सविता कपले, नलुताई भाकरे, नगरसेवक शैलेंद्र बोराडे, अंबादास निंबाळकर, आशिष सारसार, अशोक काळपांडे, शाम देवताळू, कमल गांधी, विजय तिवारी, संजय पांडव, रवी पाचपोर, रामकृष्ण हिंगणकार, अनिल जयस्वाल, गोटू खत्ती, बाळू चव्हाण, नंदू काथोटे, कैलास डोबे, सुरेश इंगळे, अरुण खिरोडकार, शरद खवणे, ओंकार वानखडे,शकिर खान, शोएब, आजम खान, बंडू वानखडे, यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक, भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी वीज वितरण कंपनी च्या कार्यलयाला ताळा ठोकण्या साठी उपस्थितीत होते.