Home Breaking News Happy Sunday! दर रविवारी पर्यटन विशेष बस सुविधा

Happy Sunday! दर रविवारी पर्यटन विशेष बस सुविधा

81

सहल प्लँन करताय वाचा, अजिंठा, वेरूळ लेणी व जाळीचा देव या ठिकाणांची सविस्तर माहिती…

बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्याकरीता लोकभिमुख पर्यटन सेवा द. 7 फेब्रुवारी 2021 रोजी पासून सुरु करण्यात आली आहे. पर्यटन सेवा विशेष बस दर रविवारी सुरु राहणार असून ही बस बुलडाणा ते वेरुळ लेणी मार्ग जाळीचा देव, अजिंठा लेणी अशी राहणार आहे.

सदर बस दर रविवारी बुलडाणा बसस्थानकावरुन सकाळी 7 वाजता निघणार आहे. ही बस 7.30 वाजता जाळीचा देव या ठिकाणी पोहचेल, 7.30 ते 8.30 वाजता देव दर्शनाकरीता वेळ राहील, सकाळी 9.15 वाजता अजिंठा येथे पोहचेल, 9.15 ते 1 वाजता अजिंठा लेणी पाहण्यासाठी वेळ राहील, दु. 3.10 वाजता वेरुळ येथे पाहचेल, 3.10 ते 6.15 वाजता वेरुळ लेणी पाहण्यासाठी वेळ राहील, 6.15 वाजता वेरुळ येथून 9.15 वाजता बुलडाणा येथे पाहचेल. बुलडाणा ते वेरुळ लेणी येथून परत बुलडाणा असे 314.2 कि. मी. असे एकुण प्रवास भाडे तिकिट प्रौढाकरीता 420 रुपये, लहान मुलांसाठी 210 रुपये भाडे असणार आहे. या बससेवेसाठी महामंडळाच्या अधिकृत www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर बुकिंग करावे. तसेच पर्यटन बस सेवाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रण व विभागीय वाहतुक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी

बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत. लेणी घनदाट जंगलाने वेढलेल्या आहेत.[२] भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील १२ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा या यादीत समावेश आहे. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इ.स. १९८३ साली घोषित केली आहे.[३] आणि या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान आहे.[४] जून २०१३ मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली असता त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे.[५][६] लेण्यांमधील चित्रांपैकी एका लेण्याचे चित्र भारतीय चलनातील २० रुपयांच्या एका नोटेवर आहे.

अजिंठा लेण्यांत गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय अविष्कार पाहायला मिळतो. अशी ही अजिंठा लेणी देशी पर्यटकांसोबतच प्रामुख्याने विदेशी पर्यटकांच्या सर्वाधिक प्रसंतीचे पर्यटन स्थळ ठरले आहे. चित्र—शिल्पकलेचा नितांतसुंदर अनुभव देण्याऱ्या या लेण्यांमधून त्या काळात वापरण्यात आलेल्या रंगछटा पर्यटकांना पाहावयास मिळतात.

१९५१ साली भारत सरकारने या लेण्याला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इ.स. १९८३ मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला.कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अदभुत आहे, राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा (प्रथम) (757-783) मध्ये बांधण्यात आले होते. हे एलोरा(वेरुळ) जिल्हा औरंगाबाद येथे स्थित आहे.

वेरूळ अदभुत स्थापत्य शास्त्र कौशल्य

संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे, ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. एकूणच 276 फूट लांब, 154 फूट रुंद, हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे. ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आहे. ते बांधण्यासाठी, खडकातून सुमारे 40 हजार टन दगड काढला गेला. पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि 90 फूट उंच मंदिर बांधण्यात आले. मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. या मंदिराची महल तीन बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती. आता हे पुल पडले आहे. खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्य शास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमूना आहे.

जाळीचा देव महत्त्वाचे धार्मिक ठिकाण

जाळीचा देव हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्‍यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्‍वामी यांचे काही काळ वास्‍तव्‍य होते.

श्रीक्षेत्र जाळीचा देव – अजिंठ्यापासून २८ किलोमीटरवर महानुभाव पंथीयांचे “जाळीचा देव’ हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी बाराव्या शतकात महाराष्ट्रभ्रमण करत होते. ते श्री चक्रधर स्वामी गंगातीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, शेंदुणी, चांगदेव, हरताळा येथे आले. हरताळा येथून स्वामी सावळतबारा येथे आले. येथून वालसाविंगीस (जि. जालना) जाताना पवथताच्या या घनदाट अरण्यात जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी ते थांबले. त्या ठिकाणी यांना दोन वाघिणीची पिल्ले दिसली. ते त्या पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरुवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्या ठिकाणी आली व गर्जना करू लागली . स्वामींनी तिच्याकडे कृपाकटाक्ष टाकताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे स्वामींकडे पाहून शेपटी हलवू लागली. ही लिळा(घटना) वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली. म्हणून या तीथथक्षेत्राला जाळीचा देव हे नाव पडले. वाघोदा (जि. जळगाव) येथील भक्त (कै.) लक्ष्मणराव पाटील आपला कुष्ठरोग चांगला व्हावा यासाठी सन १९३६मध्ये येथे आले. त्यांनी येथे एकवीस दिवस उपवास करून नामस्मरण केले. एकविसाव्या दिवसी पहाटे तीनला एक साधू त्यांना स्वप्नात दिसले. व म्हणाले तू मला सावली कर, मी तुझा रोग नष्ट करतो. त्यानंतर थोड्याच दिवसात श्री. पाटील निरोगी झाले. स्वप्नात परमेश्वराला दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी या स्थानाभोवतीची झाडे झुडुपे काढून १९३८मध्ये मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. त्यावेळी तेथे निजामच्या बादशाहाची राजवट असल्यामुळे येथील अधिकारी बांधकामासाठी मंजुरी देत नव्हते. तेव्हा (कै.) श्री. पाटील व तेथील पुजारी (कै.) दत्तूबुवा हैदराबादला जाऊन बांधकामाची परवानगी घेऊन आले. १९४२मध्ये सभामंडपाचे काम पूर्ण होऊन कलशारोहण समारंभ थाटात झाला.

नारळासाठी गुराख्यांना स्थान दर्शन लाभ –

स.न. १९२० ते १९२५ या काळात येथे कुणीही राहत नव्हते. जाळीच्या वेलांखाली दगड मातीचा ओटा मात्र बाधंलेला होता या आठवणी आजही सावळदेवा गावचे वृद्ध गुराखी सागंतात की पौर्णिमेचा दिवस असला की येथील गुराखी या स्थानावर आवर्जून जात, कारण या स्थानावर तुरळक भक्तांनी अर्पण केलेले नारळ असत.. साधारण चार ते पाच नारळ मिळायचे. सर्व गुराखी एकत्र येऊन हे नारळ फोडून खात.

जाळीचा देव, अजिंठा-बुलढाणा रोडवर अजिंठयांहून पूर्वेस २९ किमी आहे.