Home Breaking News घरफोडीतील अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

घरफोडीतील अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

78

 

बुलडाणा: पोलीस अधिक्षक बुलडाणा यांनी बुलडाणा जिल्हयामधील घर फोडी तसेच मोटार सायकल दुचाकी चोरी करणारे आरोपीविरुध्द कठोर कार्यवाही करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बळीराम गिते यांनी विशेष पथक नियुक्त करुन सदर गुन्हयातील गु्हेगाराविरुध्द कार्यवाही करण्याचे सांगीतले. 11/2/2021 रोजी मालमत्तेविरुद्द घडणा-या गुन्हयांच्या संदर्भात पेट्रोलिंग करीत असतांना, गोपनिय माहिती मिळाली की, पो.स्टे. जळगांव जामोद येथे दाखल अप.क्र. 670/20 कलम 457,380 भादवि मधील चोरीस गेलेल्या मुदेदमालापैकी एक मोबाईल हा काही आरोपी वापरत असुन सध्या ते पो.स्टे. जळगांव हद्दीत असल्याबाबत खात्रीलायक व गोपनिय माहिती मिळाल्याने स्था.गु.शा. च्या विशेष पथकाने सापळा रचुन सदर आरोपी नामे मालसिंग नानसिंग बहेलिया वय 30 वर्ष रा. जळगांव जामोद जि. बुलडाणा , अरुण रुमसिंग जमरा वय 25 वर्ष रा. कहुपट्टा ता. जळगांव जामोद जि बुलडाणा यांना ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता नमुद दोन्ही आरोपीतांनी तीन महीण्यापुर्वी जळगांव जामोद हददीतील उसरा गावामघ्ये रात्रीमध्ये बंद चोरी घरात चोरी केल्याचे कबुल केले तसेच दोन्ही आरोपीनी जळगाव जामोद शहरातील दोन दुचाकी सुध्दा केल्याचे कबुली दिली. यावरुन आरोपीचे ताब्यातुन घरफोडी मधील मोबाईल तसेच एक दुचाकी जप्त केली असुन त्यांना पुढील कायदेशीर कार्यवाही साठी पो.स्टे. जळगाव जामोद यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपींताकडुन जळगाव जामोद व परीसरातील इतरही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक, खामगाव, हेमराजसिंग राजपुत, अपर पोलीस अधीक्षक बुलडाणा, बजरंग बनसोडे सा. यांचेबमार्गदर्शनात ,पो. नि. बळीराम गिते यांच्या आदेशान्वये सपोनि नागेशकुमार चतरकर, पोउपनि निलेश शेळके, नापोका दिपक पवार, संजय नागवे, पोको नदीम शेख, विजय सोनोने, चालक पोकॉ सुरेश भिसे, पोस्टेचे पोना राजू आडवे, पोको कैलास ठोंबरे यांनी केली.
सायबर