Home Breaking News बुलडाण्यात कोरोनाचा धोका कायम, आजही रुग्ण आढळले

बुलडाण्यात कोरोनाचा धोका कायम, आजही रुग्ण आढळले

84

कोरोना अलर्ट : प्राप्त 508 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 79 पॉझिटिव्ह

  • 58 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 12 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 587 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 508 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 79 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 57 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 22 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 425 तर रॅपिड टेस्टमधील 83 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 508 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 18, चिखली तालुका : अंचरवाडी 2, शेलूद 1, पिंपळगांव 1, जांभोरा 1, किन्होळा 1, भालगाव 1,  दे. राजा शहर : 9, दे. राजा तालुका : गिरोली बु 1, लिंबा 1,  गारखेडा 1, गारगुंडी 1, आळंद 1, सिं. राजा शहर : 1,  सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, मलकापूर पांग्रा 1, मोहाडी 1, राजेगांव 1, मेहकर तालुका : हिवरा खु 1, लोणार शहर : 1,  बुलडाणा तालुका : सुंदरखेड 2, रूईखेड 1, सागवन 1, वरवंड 2, बुलडाणा शहर : 17, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : वाडी 1, खामगांव शहर : 1, खामगांव तालुका : घाटपुरी 1, दोंदवडा 1, मलकापूर शहर : 3, नांदुरा शहर : 1, मूळ पत्ता जाफ्राबाद जि. जालना 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 79 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे राजेगांव ता. सिं.राजा येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 58 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 14, चिखली : 1, दे. राजा : 12, बुलडाणा : स्त्री रूग्णालय 8, अपंग विद्यालय 3,  लोणार : 7, शेगांव : 2, चिखली : 9, मेहकर : 2.

  तसेच आजपर्यंत 114524 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14012 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14012 आहे.

  तसेच 812 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 114524 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14614 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14012  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 427 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 175 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.