Home Breaking News तर… नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना आंदोलन करणार

तर… नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना आंदोलन करणार

75

नांदुरा : महाराष्ट्राच्या तळागळातील गोरगरीब जनतेची अविरत जनसेवेच्या ७३वर्षाची सेवा करणारी तुमची,आमची,सर्वांची एस.टी.आहे.इ.स.१९४७मध्ये राज्यातील रस्ते प्रवाशी वाहतुकीची राष्ट्रीय योजना पुर्ण करुन एस.टी.ला टप्पे वाहतुकीचा अधिकार देण्यात आला आहे.एस.टी.ने स्थापनेपासुन सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात टप्पा वाहतुक करुन सेवा देत आहे.मात्र सध्यास्थितीत एस.टी.च्या छातीवर “मॅक्सिकॅबला”अधिकृत करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.याबाबत लोकमत,लोकसत्ता,सकाळ इत्यादी प्रमुख वर्तमानपत्रांमधुन “मॅक्सिकॅब”बाबत वृत्त प्रकिशित झाले आहे.मॅक्सिकॅबला अधिकृत करण्याकरीता अतिरीक्त पोलिस महासंचालक डाॅ.भुषणकुमार यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय परिवहन मंत्री मा.अनिल परब यांनी घेतला आहे.जर हा निर्णय लागु केला गेला तर त्याचा थेट परिणाम एस.टी.वर होणार असुन एस.टी.ची स्वायतत्ता मोडीस येणार आहे.एकंदरीत एस.टी.ला संपवण्याचाच तर हा डाव नाही ना?जर अशा एस.टी.विरोधी धोरणांचा निर्णय राज्यशासनाने घेतला मॅक्यिकॅब या ७,१२आसनी गाड्यांना अधिकृत परवानगी दिली तर महाराष्ट्रातील जनतेच्या व एस.टी.च्या हितांकरीता महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना सरकारविरोधात रत्यावर ऊतरुन आंदोलन करेल.एस.टी.च्या विरोधी धोरणांचा तसेच खाजगीकरणाचा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना सातत्याने विरोध करीत आहे.महाराष्ट्राची जिवनवाहीनी एस.टी.ला संपवण्याचा कुटील डाव हाणुन पाडला जाईल.एकीकडे राज्यशासन एस.टी.ला एक हजार कोटींची आर्थीक मदत जाहीर करते दुसरीकडे मॅक्सिकॅब अधिकृत करण्यास समिती स्थापन करते अशा प्रकारचे दुटप्पी धोरण अत्यंत घातक आहे.इ.स.२००७ला मॅक्सिकॅबला अधिकृत करण्याचाअसाच प्रयत्न केला गेला होता तो हाणुन पाडला गेला.आत्ता पुन्हा तेच सुरु आहे.अशा जनताविरोधी निर्णयातुन सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे?महाराष्ट्रातील धनदांडग्यांना पोसण्यासाठी तर हे चालले नाही ना?एस.टी.कामगारांचा वेतन करार प्रलंबित आहे एस.टी.कर्मचार्‍यांना अत्यंत कमी वेतनात ८ ते १०तास काम करावे लागते याकडे राज्य शासन व एस.टी.प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम एस.टी.वर होत आहे.एस.टी.कामगारांच्या वेतनवाढीला प्रलंबीत ठेवले जात असुन खाजगीकरणाचा डाव आखला जात असेल?तर म.न.रा.प.का.सेना स्वस्थ बसणार नाही.महाराष्ट्रातील जनतेकरीता,एस.टी.व एस.टी.कामगारांच्या हितांकरीता मा.राजसाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.हरी माळी साहेब यांचे नेतृत्वात महाराष्ट्रव्यापी आंदोलन केले जाईल अशी भुमिका म.न.रा.प.का.सेनेकडुन महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रदिप गायकी यांनी दिलेल्या मुलाखती मध्ये मांडली आहे.