Home Breaking News गजानन महाराजांचे नाव देऊन अकोला विमानतळावरून विमानसेवा सुरू करावी –

गजानन महाराजांचे नाव देऊन अकोला विमानतळावरून विमानसेवा सुरू करावी –

73

गजानन महाराजांचे नाव देऊन अकोला विमानतळावरून विमानसेवा सुरू करावी –

रा.कॉ. नेते गोपाळ पाटील यांची ना.जयंत पाटलांकडे मागणी

शेगाव: श्री संत गजानन महाराजांचे तिर्थक्षेत्रामुळे संतनगरी शेगावला दररोज देशभरातून असंख्य भाविक येत असतात.शेगाव येथून अकोला केवळ 46 ते 50 कि मी अंतरावर आहे.अकोला मधील शिवणी येथे असलेल्या विमानतळास श्री संत गजानन महाराजांचे नाव देण्यात यावे व याठिकाणांहून भाविकांच्या सोयीकरिता विमानसेवा सुरू करावी ही मागणी गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच श्री भक्तांकडून कडून केली जात आहे.याकरीता संबंधित अधिकारी व विभाग तसेच खा सुप्रियाताई सुळे,बुलडाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ, विद्यमान पालकमंत्री ना.डॉ राजेंद्र शिंगणे,यांचेकडे यापूर्वी या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.गेल्या 20 वर्षांपासून पाठपुरावा करत आहे.तरी आपण याकडे जातीने लक्ष द्यावे आणि हा प्रस्ताव राज्य शासनाचे वतीने मंजूर व्हावा यासाठी आपण स्वतः प्रयत्न करावे अशी मागणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस गोपाळराव पाटील गणेश  रा.कॉ चे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांची शेगाव दौऱ्यांप्रसंगी भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.बुलडाणा,अकोला,वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपुर इत्यादी ठिकाणच्या भाविकांनी सुद्धा सदर नामकरणाबाबत पाठपुरावा केला आहे. शिर्डीचे धर्तीवर श्री संत गजानन महाराजांचे तिर्थक्षेत्रामुळे देशभरातील भाविक भक्तांना येण्या जाण्यासाठी शेगाव जवळील अकोला शिवणी विमानतळ सोयीचे आहे.त्यामुळे या विमानतळावरून विमानसेवा सुरू करावी अशी मागणी सुद्धा गोपाळ पाटील यांनी केली आहे.