Home Breaking News स्मार्ट ग्राम पुरस्कारअंतर्गत खातखेड गाव शेगांव तालुक्यात सर्वात प्रथम

स्मार्ट ग्राम पुरस्कारअंतर्गत खातखेड गाव शेगांव तालुक्यात सर्वात प्रथम

94

शेगाव : ग्रामपंचायत खातखेड पंचायत समिती शेगांव अंतर्गत गावाला स्व.आर.आर ( आबा ) पाटील सुंदर गांव स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना मधून ग्रामनिवड करीता जिल्हा स्तरीय समिती हे पुनमूल्यांकन करून सदर गाव हे खातखेड हे गाव सुंदर गाव म्हणून गौरविण्यात आले दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे गौरव समारंभ आयोजित करण्यात आला तेव्हा जि.प अध्यक्ष मनीषाताई पवार माननीय मुख्य कार्यकारीअधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांचे हस्ते गावाचे लाडके सरपंच तथा ग्राम सामाजिक सरपंच संघटना अध्यक्ष तथा शिवसेना तालुका उपप्रमुख श्री रामेश्वर थारकर व ग्रामसेविका सुषमा सावरकर तसेच ग्रामसेवक श्री बाजोले साहेब यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तेव्हा सरपंच यांनी जिल्हास्तरीय तपासणी कार्यक्रम करण्यासाठी जिल्हा परिषद बुलढाणा येथील उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय चोपडे यांच्या उपस्तितीत पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री सतीश देशमुख,विस्तार अधिकारी पंचायत समिती श्री संदीप दळवी, श्री नांगरे साहेब तसेच जिल्हा व पंचायत स्तरावरील संबंधित तपासणी अधिकारी वर्ग यांच्या सहकार्यानेे तसेच सदर गाव हे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मार्फ़त गेल्या तीन वर्षांमध्ये करत असलेले विविध विकास व नाविन्यपूर्ण कामांना गती देऊन विशेष सहकार्य करणाऱ्या ग्रामपरिवर्तक श्री प्रविण भवटे यांच्या मार्फत शासनाच्या विविध योजना व गावातील समस्या, गरज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या मधे सुसंवाद घडवत विविध कामे मार्गी लावण्यात आली व सदर पुरस्कार मिळवू शकलो असे सरपंच श्री रामेश्वर थारकर यांनी माहिती दिली.