Home Breaking News भाजपाचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात असा सोशल ट्रेंड

भाजपाचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात असा सोशल ट्रेंड

77
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
खामगाव – सचिन वाझे प्रकरणात भारतीय जनता पार्टीने आपला मोर्चा आता थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे वळविला आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा कडून व्हुव्हरचना सुरू असल्याची माहिती आतील गोटातून प्राप्त झाली असून त्यासाठी सोशल मिडियातून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्या जात आहे.
प्रसिध्द उद्योगतपी अनिल अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या भरलेली कार पोहचविल्याचा आरोपाखाली पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर एनआयए ने गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमविरसिंह यांची बदली करण्यात आली. हे सर्व प्रकरण भारतीय जनता पार्टीने अधिवेशनापासून लावून धरले होते. या प्रकरणात सरकार अडचणीत येईल किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागेल असे वाटत असतानाच सरकारने अधिकाºयांची बदलाबदली करून डँमेज कंट्रोल चा प्रयत्न केला. मात्र भाजपा यावर समाधानी असल्याचे दिसत नाही. दरम्यान आता भाजपाच्या सायबर सेलने थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातच सोशल ट्रेंड सुरू केला आहे. ‘रिझाइन अनिल देशमुख’ असा हँशटँग वापरून गृहमंत्र्यांच्या विरोधात सोशल मिडियावर विविध पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल केल्या जात आहे. महिला अत्याचार, आगीच्या घटना व आताचे वाझे प्रकरण यासह कायदा व सुव्यवस्थेच्या विविध मुद्यावरून भाजपाकडून गृहमंत्र्यांना ट्रोल केले जात असून ‘गृहमंत्री झाला खोटो, गुन्हा झाला मोठा’ अशा मथळ्याखालील पोस्ट सध्या भाजपाच्या आयटी सेल कडून सोशल मिडियावर पसरविल्या जात आहेत. त्यामुळे आता राजकारणातील सोशल वार चे परिणाम काय होतात हे येणाºया काळात दिसेलच.