Home Breaking News भंगार व्यवसायिक इंगळे बंधुवर हल्ला, मोहन अहीर, राम अहीरसह २३ जणांवर गुन्हा

भंगार व्यवसायिक इंगळे बंधुवर हल्ला, मोहन अहीर, राम अहीरसह २३ जणांवर गुन्हा

85

 

खामगाव : येथील आठवडी बाजार भागातील भंगार व्यवसायिक इंगळे बंधुवर 20 ते 23 जणांनी  हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ मार्चच्या दुपारच्या सुमारास घडली होती. त्यानंतर आठवडी बाजारात तणाव निर्माण झाला होता.

या घटनेची फिर्याद राजेंद्र नामदेवराव इंगळे (वय 56 वर्षे , व्यवसाय – भंगार दुकान रा. सुटाळपूरा खामगांव) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे आहे. त्यात नमूद आहे की, मोहन देवीनारायण अहिर, रामु देवीनारायण अहिर , रतन देवीनारायण अहिर, मनोज अहिर ,आशिष अहिर ,अक्षय मोहन अहिर, अदित्य मोहन अहिर, रोशन अहिर, शाम अहिर आकाश वायचाळ सर्वरा. सतीफैल
खामगांव ,विक्की पारधी ,राम मदन वगर , बाळू अतकरे , रघु तिवारी, विलास वाशीमकर रा खामगांव आणखी 7 ते 8 हे 27 मार्च रोजी दुपारी 2 वाजता इंगळे यांच्या भंगार दुकानावर आले. यातील मोहन अहीर म्हणाला की तुझी दुकान नगर परिषदच्या जागेमध्ये असून त्याचे मला तुम्हांस पैसे दयावे लागतील नाहीतर मी तुझी दुकान इथून हटवून टाकील या कारणावरुन आरोपीतांनी शिवीगाळ करुन संगनमत करुन गैरकायदायाची मंडळी जमवून इंगळे व त्यांच्या भावास लाठयाकाठया,लोखंडी रॉड, हातोडी, सेंट्रींगच्या राफटर घेवून मारहाण करुन तसेच मुलगा अभय यास डोक्यावर हतोडीने लोखंडी पाइप आणि सेंट्रींगचे राफटर व लोखंडी झा-याने मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे. 28 मार्च रोजी इंगळे यांनी लेखी दिलेल्या रिपोर्टवरुन विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सपोनि पांडुरंग इंगळे करत आहेत.

या घटनेतील मोहन अहीर हे नगर परिषद कर्मचारी तर राम अहीर हे माजी नगरसेवक आहेत. तर इंगळे परिवार खामगावच्या मेडीकल, ऑईलमिल, बांधकाम, मेडिकल, शेती, अश्या विविध उद्योग व्यवसाय क्षेत्रात प्रसिद्ध आहे.