Home राज्य एकाच चितेवर 8 मृतदेहांचे अंत्यसंस्कार!

एकाच चितेवर 8 मृतदेहांचे अंत्यसंस्कार!

85

 

बीड : इतकेच मला जातांना सरणावरती कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, अशी परिस्थिती आपल्यावर कोरोनाने विषाणूने आणली आहे. जीवंत असतांना यातना आणि मरण झाल्यावर अवहेलना असे वाईट प्रसंग ओढवत आहेत. देशात महाराष्ट्र राज्यात जणू कोरणाचा वणवा पेटला आहे, एकिकडे हा वणवा पेटला असताना दुसरीकडे मात्र गोरगरिबांची चूल पेटायचे वांधे झाले आहे. लॉकडाऊन असह्य होत आहे. त्यामुळे काय करावे काय नको असा सवाल सर्वाना पडला आहे.

राज्यात दररोज कोरोना रुग्ण वाढत असून दुसरी लाट आल्यावर मृत्यू सुद्धा वाढले आहेत. कोविड उपचार केंद्र फुल्ल आहेत, ओक्झिजन, बेडचा तुटवडा निर्माण झालेला आहे. तर लसीकरण मोहीम सुद्धा साठा कमी पडू लागला असल्याने थंडावली असल्याचे दिसते. कोरोनाने होणारे मृत्यू मानला चटका लावत आहेत. डोळ्यासमोर असलेलं लोक अचानक आपला निरोप घेत आहेत.आपल्या राज्यात आजची सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास ५ लाख एवढी होत आहे, एकूण मृतांची संख्या ५७ हजार तर आतापर्यंत एकूण बाधित झालेले रुग्ण ३० लाख आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर २० ते २५ टक्के असताना असून रोज ६ लाखांचे लसीकरण होत आहे.

आरोग्य विभागाने सूचने नुसार ज्या रुग्णाचा कोरोनाने मृत्यू होतो, त्याच्या अंत्य संस्काराला सुद्धा जवळच्या लोकांना हजर राहता येत नाही. आरोग्य कर्मचारी व एक दोन परिवापरातील सदस्य अंत्यसंस्कार करतात. दोन दिवसांपूर्वी काळीज पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला असून त्याचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. तो पाहिला तर आपणही हळहळ व्यक्त कराल, क्षनभर स्तब्ध व्हाल. हा प्रकार राज्यातील मराठवाडा विभागात घडला आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील पॉझिटिव्हचा रुग्णांचा आकडा दररोज वाढत असताना मृत्यूचा दर देखील झपाट्याने वाढत आहे. स्वाराती रुग्णालयात सात आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड मृतांवर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अग्नी देण्यात आला.

यापूर्वी मागील वर्षी 6 सप्टेंबर रोजी अंबाजोगाईत याच ठिकाणी आठ मृतांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बरोबर सात महिन्यानंतर पुन्हा तीच दुर्दैवी वेळ आली आहे. हवं फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर वायरल झाला असून लोक संवेदना व्यक्त करत आहेत.