Home Breaking News खामगावच्या शेतकरी पती पत्नीने केली कर्जाला कंटाळून आत्महत्या

खामगावच्या शेतकरी पती पत्नीने केली कर्जाला कंटाळून आत्महत्या

86

औरंगाबाद : कर्जबाजारी असल्याने वाढत असलेल्या आत्महत्या चिंतेचा भाग बनत आहेत. दररोज एक तरी आत्महत्या घडल्याची घटना कानावर येते. दरम्यान काल रामेश्वर गायके (35) अनिता रामेश्वर गायके(30) या तरुण शेतकरी पती पत्नीने कर्जाला कंटाळून स्वत:च्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक रामेश्वर याच्यावर बँक आँफ इंडीया या बँकेचे व अन्य खाजगी काही कर्ज असल्याने हे कर्ज फेडायचे कसे? या विवेचनेत हे दोघे पती पत्नी गेल्या महिण्यापासून होते.

गुरुवारी रात्री कुटुंबासोबत त्या दोघांनी जेवणे केले. एक मुलगा, एक मुलगी हे काही दिवसापासून मामाच्या गावी असल्याने आई- वडील झोपी गेल्यानंतर हे दोघे पती पत्नी रात्री घरातुन मोटारसायकलवर खामगाव शिवारातील गट 197 या गटातील स्वत:च्या शेतात गेले.
शेतात दोघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

ही माहिती पोलीस पाटील लक्ष्मण बोर्डे यांना कळताच त्यांनी देवगाव रंगारी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश जोगदंड यांना माहिती दिली. माहिती मिळताच बिट जमादार शिवनाथ आव्हाळे, पोलीस हेडकाँस्टेबल विजय धुमाळ यांच्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोघाचे मुतदेह शवविच्छेदनासाठी औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी प्रदिप कांबळे यांनी शवविच्छेदन करुन मुतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृतक पती पत्नी कन्नड( जिल्हा औरंगाबाद) तालुक्यातील खामगाव  येथील रहिवासी आहेत.