Home Breaking News शिवसेना भाजपात ‘राडा’; माजी आमदाराला मारहाण, आजी आमदाराचा पुतळा जाळाला

शिवसेना भाजपात ‘राडा’; माजी आमदाराला मारहाण, आजी आमदाराचा पुतळा जाळाला

82

बुलडाणा : जिल्ह्यातील भाजप-शिवसेनेत आज राडा सुरू असून जळगांव जामोद येथे आजी आमदाराचा पुतळा जाळला तर बुलडाणा येथे माजी आमदार विजयराज शिंदे यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

बुलडाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांना उद्देशाने केलेलं व्यक्तव्य आज जिल्ह्यात व राज्यात चांगले चर्चेत आले. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी आमदार संजय गायकवाड़ यांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या भाजपा नेते आणि पदधिकार्यांना शिवसेना कार्यकर्त्यांच्या संतापला सामोरे जावे लागले. शिवसेना नेते विजयराज शिंदे यांच्या सहित तीन ते चार भाजपा कार्यकर्त्यांवर शिवसैनिकानी हल्ला चढविला. दुपारी 4 वाजेदरम्यान ही घटना घडली. शिवसैनिकांचा आरोप आहे की, भाजपावाले आमदार गायकवाड़ यांचा पुतळा जाळण्यासाठी आले होते. तेव्हा धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष तथा आमदारपुत्र कुणाल गायकवाड़ यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात पकडापकडी झाली. शिंदे यांना खाली पाडुन त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप करीत आहे. पोलिसांच्या मध्यस्थिने दोन्ही गटाना वेगळे करण्यात आले. भाजप नेते योगेंद्र गोड़े तथा विजयाताई राठी, प्रभाकर वारे, सोनू बाहेकर, करण बेंडवाल तसेच अनेक भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. इकडे शिवसैनिकांमध्ये श्रीकांत गायकवाड़, बाळासाहेब धुड, बंडू आसाबे, संदीप पुराणिक तसेच अनेक जण सहभागी होते. शिवसैनिकांच्या आक्रमकतेपुढे भाजपाला पळती भुई थोड़ी झाली, असा दावा शिवसेनेने केला आहे. तर शिवसेनेची दादागिरी या घटनेतून समोर आली आहे. असे भाजपचे म्हणणे आहे. दरम्यान भाजप नेते आणि कार्यकर्ते यांनी शहर पोलिस स्टेशन गाठून परस्परात विरुद्ध तक्रारी केल्या आहेत.
आमदार संजय गायकवाड़ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोना विषाणु कोंबायचे विधान केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपने गायकवाड़ यांचा पुतळा जाळण्याचे ठरविले होते परंतु शिवसैनिकानी भाजपचा प्लान फेल केला.

आ. यांच्या पुतळ्याचे दहन

जळगांव जा. येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक १८ एप्रिल रोजी स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर डॉ. आ. संजय गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन केले गेले.त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आ.डॉ. संजय कुटे यांनी पत्रकार परिषद घेतली.

आ. संजय गायकवाड यांचे वक्तव्य म्हणजे विकृत मनोवृत्तीचे दर्शन —- आ.डॉ. संजय बुलढाणा जिल्हा म्हणजे जिजाऊ चे जन्मस्थान,सुसंस्कृत जिल्हा,येथील विकृत मनोवृत्तीच्या मवाली आमदाराने देशाचे पंतप्रधान,माजी मुख्यमंत्री यांच्या विषयी अतिशय शिवराळ,गलिच्छ भाषेत वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन करून दिले. अशा आमदारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंदोबस्त करावा ,तसे न केल्यास शिवसेनेची सुद्धा हीच संस्कृती आहे असा समज महाराष्ट्रभर पसरेल. पंतप्रधाना सारख्या नेत्यांबद्दल असभ्य वर्तन करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या मवाली आमदारावर गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी, अन्यथा भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा गर्भित इशारा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय कुटे यांनी दिला.
. मुख्यमंत्री वारंवार सांगत असतात कोरोन्स सदृश्य परिस्थितीत राजकारण करू नका. पण महा विकास आघाडीचे नेते सातत्याने राजकारण करून महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करीत असतात.
वर्षभरापासून कोरोणा सदृश्य परिस्थितीमुळे आपण मतदारसंघात कुठेही जाहीर कार्यक्रम आयोजित केले नाहीत. कोरोणाच्या सर्व नियमांचे पालन केले. परंतु महा विकास आघाडीचे मंत्र्यांचे ,नेत्यांची भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम, मिळावे हे सातत्याने सुरूच असतात.त्यामुळे त्यांची ही भूमिका म्हणजे- आहे, असेही आमदार डॉ. संजय आहे.
सध्या देशाची परिस्थिती फार बिकट आहे. अशा परिस्थितीत ह्या विषयावर बोलताना आपणास फार वेदना होतात. परंतु आपल्या नेत्यांविषयी अतिशय खालच्या स्तरात गायकवाड नामक मवाली आमदाराने शब्द काढल्याबद्दल नाईलाजास्तव बोलावे लागते.असेही डॉ कुटे म्हणाले.
इच्छा नसतानासुद्धा बोलाव वाटत आहे. नेत्यांचा अनादर करणे ही आपली संस्कृती नाही असे यावेळी आमदार कुटे म्हणाले. पोलीस प्रशासनानाकडे उद्यापण रीतसर तक्रार करणार असून आमदार गायकवाड यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी सुद्धा करणार आहोत. भाजपाचे कार्यकर्ते संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करणार आहेत. पोलिसांनी जर कारवाई केलीच नाही तर कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, सोशल डिस्टंसिंग चा भंग होईल, जनक्षोभ उसळेल आणि हेच महाविकास आघाडी शासनाला अपेक्षित आहे. हे सर्व टाळण्यासाठी त्यांनी मवाली आमदार संजय गायकवाड यांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी आ. संजय कुटे यांनी यावेळी केली. आ. संजय गायकवाड यांचे पुतळ्याचे दहन स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर आ. संजय कुटे यांचे नेतृत्वात आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ह्या पुतळ्याला चपला सुद्धा मारल्या.
पुतळ्याचे दहन प्रसंगी संजय गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सौ. सीमाताई डोबे, तालुका भाजप अध्यक्ष प्रकाश वाघ, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकरे, शहर भाजप . अध्यक्ष अभिमन्यू भगत, माजी शहराध्यक्ष डॉ. प्रकाश बगाडे ,महिला शहराध्यक्ष, बाजार समिती संचालक राम इंगळे, शाकिर खान, सुनील रघुवंशी ,भाजयुमोचे शहराध्यक्ष उमेश येऊल यांच्यासह भाजपाच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

आ.गायकवाड पुन्हा आक्रमक

दरम्यान ही पत्रकार परिषद झाल्यावर आ.संजय गायकवाड पुन्हा आक्रमक होत समोर आले. ‘टिनपाट आमदार संजय कुटे माझा पुतळा काय जाळता हिम्मत असेल तर समोर येवून दाखवा, संजय गायकवाड काय आहे हे दाखवून देतो’ असे ते म्हणाले आहे.

काय म्हणाले होते आ. संजय गायकवाड

मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, अशी टीका बुलडाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी केली होती.

महाराष्ट्रात कोरोना साथीचा कहर सुरू आहे. या संकट काळात केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार सहकार्य करण्याऐवजी उलट कोंडी करत आहे. तर महाराष्ट्रातील भाजपची मंडळी खिल्ली उडवीत आहेत. भाजपच्या लोकांचे नीच राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे, असा आरोप बुलडाणा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र आणि भाजपच्या राजकारणावर संताप व्यक्त करीत पंतप्रधान मोदी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आ.चंद्रकांत पाटलांवर मुक्ताफळे त्यांनी उधळली. इतक्या न थांबता आमदार गायकवाड यांनी सांगितले कि, ज्याचा घरातील माणूस कोरोनाने मरतो त्यालाच माहीत आहे कि, कोरोना काय आहे. मात्र भाजपवाल्यांना याची जाण नाही. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य त्यांनी केले.त्यांनतर जिल्ह्यातील भाजपा व शिवसेनेत राडा सुरू आहे.