Home Breaking News बुलडाणा घटनेनंतर आ. फुंडकर यांचा प्रशासनाला असा ईशारा

बुलडाणा घटनेनंतर आ. फुंडकर यांचा प्रशासनाला असा ईशारा

89

 

खामगांव – आमचे नेते आ.डॉ.संजय कुटे यांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. जिल्ह्यात लोकशाही आहे की गुंडाशाही? असा प्रशासनाला माझा सवाल आहे. संजय गायकवाड व त्यांच्या कार्यकर्त्यांना ताबडतोब कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी भाजपा जिल्हाद्यक्ष आ. आकाश फुंडकर यांनी यांनी केली आहे.
स्वतः चे कोरोना चे अपयश लपविण्यासाठी दुसऱ्याला दोष देत असे भ्याड हल्ले करत आहेत. दोषींना अटक झाली नाही तर बिघडणाऱ्या कायदा सुव्यवस्थेला प्रशासन जबाबदार राहील असा कडक इशारा देतो असे भाजपा जिल्हाद्यक्ष आ. आकाश फुंडकर यांनी म्हटले आहे.

आ. संजय गायकवाड यांनी खुले आव्हान दिल्यावर माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे आज भाजपा कार्यकर्ते सोबत घेऊन बुलडाणा आले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून आ.संजय गायकवाडांविरुद्ध कडक कारवाईची मागनी केली. दरम्यान कुटे येताना आ.गायकवाड यांच्या कार्यलयापासून पायी आले, जातांना त्याठिकाणी कुटे यांच्या गाडीवर गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून काचा फोडल्या.

बुलडाणा येथे वाद संपला असे जाहिर करून परत जात असताना आ.डॉ.संजय कुटे यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे कुटे यांनी ट्विटवर पुन्हा मी परत येतोय हिम्मत असेल तर अडवून दाखवा असे म्हणत आ. गायकवाड यांना अटक होत नाही तोवर बुलडाणा सोडणार नाही, असे सांगत बुलडाणा येथे कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला असून भाजपा कार्यकर्ते यांनी आहे तेथूनच आपल्या गावी परत जावे असे आवाहन केले आहे.

बुलडाणा येथे आ. संजय कुटे परत आले. आरटीओ ऑफिस पासून आ. कुटे व कार्यकर्ते पायी चालत आ. गायकवाड यांच्या ऑफिस समोर आले. तेथे भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा दिल्या. यावेळेस कडक बंदोबस्त तैनात होता. त्यांनंतर आ.संजय कुटे जिल्हा पोलीस अधीक्षक ऑफिस समोर कार्यकर्त्यांसह ठिय्या देवून बसले असून आ.संजय गायकवाड यांच्या अटकेची मागणी त्यानी केली आहे.
दरम्यान भाजपचे बुलडाणा जिल्हाद्यक्ष आ. फुंडकर हे बंगाल येथे प्रचारासाठी गेले असून त्यांनी व्हिडीओ पाठवून आपली उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली

पहा व्हिडीओ…