Home Breaking News आता 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्व जणांना कोरोना लस

आता 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्व जणांना कोरोना लस

75

दिल्ली : कोरोनाने बाधीत रूग्ण वाढत असल्याने आता18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1 मे पासून लसीकरणाची तिसरी मोहीम देशात सुरू होणार आहे. यामध्ये 18 वर्षांपुढील सर्व जणांना लस देण्यात येईल. आज सरकारने हा निर्णय घेतला.

देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दर दिवसाला देशात लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाबाबतची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उच्चपदस्थ अधिकारी आणि डॉक्टरांशी चर्चा केली. देशभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे तसेच टु टायर आणि थ्री टायर सिटीमध्येही कोरोना वेगाने पसरत आहे. यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पायाभूत सुविधांवर लक्ष द्यायला हवं असं ते यावेळी म्हणाले.लसीकरणाच्या दुसऱ्या मोहिमेत 45 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात आली. त्यांच्यापैकी जे राहिलेत त्यांना सरकारच्या लसीकरण केंद्रावर लस देण्यात येईल अशी चर्चा बैठकीत झाली.