Home Breaking News केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

82

 

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होण्याचे संकेत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान रत्नागिरी सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले आहेत. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. संगमेश्वरच्या गोळवलीमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

दरम्यान, सकाळी नाशिकमध्ये भाजपाच्या जिल्हा कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करुन तोडफोड केली. त्यानंतरही अनेक ठिकाणी अशाप्रकारची आंदोलन होत असल्याचं दिसत आहे. मात्र असं असतानाच आता विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कार्यालयांवर हल्ले करणाऱ्या शिवसैनिकांना तसेच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यामध्ये दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना इशारा दिलाय.