Home राजकारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा जाहीर निषेध – आ.ॲड.आकाश फुंडकर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा जाहीर निषेध – आ.ॲड.आकाश फुंडकर

83

खामगाव : केंद्रीय मंत्री मा.श्री नारायणरावजी राणे यांच्या एका वक्तव्याचा विपर्यास करीत राज्याचे बिघाडी सरकारने सुड भावनेने पेटून त्यांच्या अटकेचा घाट घातला आहे. हे सर्व महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणारे असून राज्याची वाटचाल अराजकतेकडे सुरु आहे.
केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे यांनी केलेल्या वक्तव्याबददल राज्यात गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु केवळ गुन्हे दाखल न करता त्यांच्या अटकेचा घाट राज्य सरकारने घातला आहे. मा.राणे साहेब हे जेवण करीत असतांना त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहेत. राज्याची वाटचाल अराजकतेकडे सुरु असून राज्यकर्तेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत. राज्यातील समस्येपासून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी ही सर्व उठाठेव असून मराठा आरक्षण, एम पी एस सी विद्यार्थी नियुक्ती शेतक-यांचे कर्जमाफी व इतर प्रश्नापासून लक्ष विचलीत करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहे.
संपुर्ण भारतीय जनता पार्टी मा.नारायणरावजी राणेंच्या पाठीशी असून संपुर्ण जिल्हयात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करावे. राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करावा. मा.राणे साहेबांच्या सुटकेपर्यंत आंदोलने सुरुच राहतील अशी प्रतिक्रीया भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांनी दिली आहे.