Home Breaking News भाजपा आमदार आकाश फुंडकर यांच्यासह सात जणांवर गुन्हा Seven people, including...

भाजपा आमदार आकाश फुंडकर यांच्यासह सात जणांवर गुन्हा Seven people, including a BJP MLA, have been booked for violating the Corona Rules

79

खामगाव: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात महाविकास आघाडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळत असतांना कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा आमदार आकाश फुंडकर यांसह सात जणांवर गुरुवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार ऍड आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी खामगावच्या वतीने टॉवर चौकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर एकत्र जमवून तोंडाला मास्क न लावता आणि एकमेकांमध्ये सामाजिक अंतर न ठेवता बुलढाणा जिल्हा दंडाधिकारी यांच्या निर्देशित केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले होते.

टॉवर चौक येथे महाविकास आघाडीचा प्रतीकात्मक गवताचा पुतळा जाळून महाविकास आघाडी सरकारचा विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला होता. दरम्यान संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याने त्यास प्रतिबंधात्मक उपाय व्हावा म्हणून बुलढाणा जिल्हाधिकारी यांचे शासनाच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता ब्रेक द चैन आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश लागू केलेला होता.

मात्र असे असताना देखील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍड आकाश फुंडकर भाजपा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष,संजय शिनगारे,नरेंद्र रोहणकार, पवन गरड ,रामानुज जगदीश मिश्रा, देशमुख रघुनाथ खेडकर, आणि इतर भाजपा पक्षाचे कार्यकर्ते यांनी बेकायदेशीररित्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कलम १८८, २६९, २७० भादवी सहकलम ५१ ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची दुटप्पी भूमिका : भाजपा

पोलिस प्रशासन सरकारच्या दबावाखाली काम करत असून राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले जात आहे. सर्वांना समान न्याय दिला नाही तर पोलिस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करू असा इशाराही भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष संजय शिनगारे यांनी दिला आहे.