Home Breaking News राजकारण !भाजपाने दिली महाविकास आघाडीला साथ!

राजकारण !भाजपाने दिली महाविकास आघाडीला साथ!

83

 

अकोला : राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही घडू शकते कोणी कुणाचा शत्रू आणि मित्र नसतो सत्तेसाठी सोयीनुसार निर्णय घेतले जातात याचा प्रत्यय पुन्हा एकदा आपला येथे आला आहे राज्यात भारतीय जनता पार्टी आणि महा विकास आघाडी यांच्यात टोकाचे मतभेद असले तरी अकोल्यात मात्र महा विकास आघाडीच्या उमेदवारांना सभापतीपदाच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी धावून आली आहे. अकाेला जिल्हा परिषदेतील दाेन्ही सभापतीपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पराभव करीत महााविकास आघाडीने बाजी मारली. महाविकासच्या दाेन्ही उमेदवारांना भाजपने मतदान केल्याने विजय सुकर झाला. वंचितला 24 तर महाविकास आघाडीला 29 मते मिळाली. तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी प्रहार जनशक्ती पक्षाच्या स्फूर्ती गावंडे तर विषय समिती सभापतीपदी अपक्ष सदस्य सम्राट डाेंगरदिवे विजयी झाले असून सर्वाधिक सदस्य संख्या असूनही पराभव झाल्याने हा निकाल सत्ताधारी वंचितसाठी धक्का मानला जात आहे.

जानेवारी 2020 मध्ये जि.प, पं.स. निवडणुका झाल्या होत्या मात्र ओबीसीच्या आरक्षणावरून सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल झाली हाेती. न्यायालयाने 4 मार्च राेजी ओबीसी-नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्क्यांपेक्षा जास्त हाेणार नाही,असे स्पष्ट केल्याने त्या जागाच रिक्त झाल्या हाेत्या. त्यामुळे 5 ऑक्टाेबर राेजी मतदान झाले आणि 6 ऑक्टाेबर राेजी निकालही जाहीर झाला हाेता. त्यानंतर रिक्त झालेल्या सभापतींच्या दाेन जागांसाठी शुक्रवारी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.

पाेट निवडणुकीनंतर वंचितचे संख्याबळ 23 झाले आहे. शिवसेना-13 (एक सदस्या काही दिवसांपूर्वी अपात्र झाली असून, सध्या प्रकरण अंधातरित आहे)  भाजप-5, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 4, प्रहार जनशक्ती पक्ष 1 व तीन अपक्ष सदस्य आहेत. त्यापैकी एका अपक्ष सम्राट डाेंगरदिवे यांनी महााविकास आघाडीकडून सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आणि भाजपने प्रहारला पाठिंबा दिल्याने महिला व बालकल्याण सभापती पद स्फूर्ती गावंडे यांच्याकडे आले असून विषय समिती सभापतीसाठी सम्राट डाेंगरदिवे अविराेध निवडून आले.

अध्यक्ष महाविकासचा – आ. देशमुख

वंचित बहुजन आघाडीच्या याेगिता राेकडे व संगिता अढाऊ या दाेघींनीही महिला व बाल विकास समिती सभापतीसाठी अर्ज भरला. परिणामी विषय समिती सभापतीसाठी डाेंगरदिवे एकटेच रिंगणात राहिले. नंतर अढाऊ यांनी अर्ज मागे घेतला आणि राेकडे व प्रहारच्या स्फूर्ती गावंडे यांच्यात लढत झाली असून यापुढे जिल्हापरिषद अध्यक्ष हा महाविकास आघाडीचा राहील, असं शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे.