Home Breaking News लाच स्वीकारताना RFO बी.डी.कटारिया एसीबी च्या जाळ्यात

लाच स्वीकारताना RFO बी.डी.कटारिया एसीबी च्या जाळ्यात

94

राहुल निर्मळ, द रिपब्लिक न्यूज नेटवर्क

जळगाव जामोद :- बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद वन परिक्षेत्र नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतो आता येथे कार्यरत असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी बी.डी. कटारिया 25000 रुपयाची लाच स्वीकारताना बुलढाणा एसीबी च्या पथकाने दिनांक 13 मे रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांच्या कार्यालयातच रंगेहाथ पकडले सदर एसीबी च्या या कारवाईमुळे संपूर्ण वनविभाग हादरून गेलाय आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी भगतराम द्वारकाधीश कटारिया वय 47 वर्ष यांच्याविरोधात पंचगव्हाण येथील 32 वर्षीय इसमाने लाचेची मागणी केल्याची तक्रार केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यातील तक्रारदार यांच्या मालकीचे टाटा 709 लोडिंग वाहन दिनांक 10 मे रोजी लाकूड वाहतूक करताना मिळून आल्याने वनविभागाचे कर्मचारी देवकर यांनी वाहन वनपरिक्षेत्र कार्यालय जळगाव जामोद येथे जमा केले होते .तक्रारदाराने वाहन सोडवण्याकरता वनपरिक्षेत्र अधिकारी यांची भेट घेतली. असता वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया यांनी स्वतःसाठी 7000 रुपये व इतर कर्मचाऱ्यांसाठी 12000 रुपये व दंडाची रक्कम 6000 एकूण 25000 रुपयांची मागणी मी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे तक्रार दिल्यानंतर पडताळणी दरम्यान लाच मागणी बाबत खात्री करण्यात आली .सापळा कारवाईदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया यांनी लाचेची रक्कम 19 हजार रुपये व दंड सहा हजार एकूण 25 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा रंगेहात पकडले सदर वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई विशाल गायकवाड पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती, परिक्षेत्र अमरावती देविदास घेवारे , अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई एस.एन .चौधरी पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा ,पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास साखरे ,पोलीस नाईक मोहम्मद रिजवान, रवींद्र दळवी ,प्रवीण बैरागी ,पोलीस शिपाई अझरुद्दीन काझी, चालत हर्षद शेख, यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. व आरोपी कटारिया यांना ताब्यात घेण्यात आले