Home Breaking News चंदनखेडा येथे विविध कामाचा भूमिपूजन सोहळा

चंदनखेडा येथे विविध कामाचा भूमिपूजन सोहळा

12

चंदनखेडा येथे विविध कामाचा भूमिपूजन सोहळा

सुवर्ण भारत: राजेश येसेकर
तालुका भद्रावती, प्रतिनिधी

भद्रावती : तालुक्यातील मौजा चंदनखे खेडा येथे विविध कामाचे भूमिपूजन सोहळा  खासदार श्रीमती प्रतिभा  धानोरकर यांच्या हस्ते पार पडला .

तालुक्यातील चंदनखेडे गाव मोठे असून गावात आदिवासी समाजाची सर्वात मोठी लोकसंख्या आहे सदर समाज बांधवा करिता कोणतीही सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेण्याकरिता सभा मंडप किंवा समाज भवन नसल्याने चंदनखेडा या गावचे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे यांनी माननीय प्रतिभाताई धानोरकर खासदार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्याने या बाबीची दखल घेऊन मौजा चंदनखेडा येथे आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत आदिवासी समाज सभागृहाचे बांधकाम मंजूर करून दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी या गावचे सरपंच नयन बाबाराव जांभुळे तसेच उपसरपंच सौ भारतीताई उरकांडे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत काळे, सुधीर मुळेवार,अनिल चौधरी, सुमित मुळेवार, बंडू कारमेंगे, ईश्वर धांडे यांच्या तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. मुक्ता सोनुले, बंडू निखाते, सौ रंजना हनवते सौ प्रतिभा दोहतरे सौ श्वेता भोयर सविता गायकवाड , नाना बगळे, निकेश भागवत सौ आशा नन्नवरे तसेच गावातील समाज बांधव माधव ननावरे ,विकास नन्नावरे सुशिलाबाई हनवते,दशरथ भरडे तसेच ग्राम काँग्रेस कमिटीचे सदस्य प्रशांत कोहळे, रवींद्र मेश्राम तसेच इतर ग्रामवासी उपस्थित होते.