Home Breaking News “कांद्याची” सुद्धा नाफेड केंद्रामार्फत खरेदी चालू करा- अक्षय पाटील

“कांद्याची” सुद्धा नाफेड केंद्रामार्फत खरेदी चालू करा- अक्षय पाटील

84

द रिपब्लिक न्यूज नेटवर्क

बुलढाणा :- यावर्षी कांद्याच्या भावात घसरण झाली असुन उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे.

जिल्ह्यामध्ये यावर्षी कांद्याचे पिक बऱ्यापैकी असले तरी भावात मात्र घसरण आहे. कांद्याला ४०० /५०० भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कसा निघेल असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

कांदा लागवडीपासून रोपे, खते, मजुरी, वाहतुक आदी खर्च पाहता भाव समाधान कारक नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा नाईलाजाने फेकुन द्यावा लागतो.

त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथील शेतकरी नारायण पिंपळे यांनी नागरिकांना मोफत कांद्याची वाटप केली.

कांद्याला भाव मिळत नसल्याने व्यापारी सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला फिरकुनसुद्धा पाहत नाही. माय-बाप शेतकरी रांत्रनदिवस हाडाचे हाल कष्टाचे पाणी करुन जर भाव मिळत नसेल तर ही शोकांतिका म्हणावी लागेल.

तरी शासनाने शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करता कांद्याला चांगला भाव देऊन जिल्ह्यातील नाफेड केंद्रामार्फत खरेदी चालू करावी .

अन्यथा भुमीपुत्रांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.