Home Breaking News कांद्याने आणले शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

कांद्याने आणले शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

86

द रिपब्लिक न्यूज नेटवर्क

शेगाव :- यंदा कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाली असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे बुलढाणा जिल्ह्यात कांदा हे भाजीपाला वर्गीय नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेत असतात यावर्षी कांद्याचे पीक बर्‍यापैकी असले तरी भावात मात्र प्रचंड घसरण झालेली आहे 400 ते 500 रुपये प्रतिक्विंटल दरही कांद्याला मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कसा निघेल असा प्रश्न आता टाकला आहे दरम्यान अनेक व्यापाऱ्यांनी सौदे करूनही  कांद्याची उचल केली नसल्याच्या तक्रारी सुद्धा येत आहेत भाव वाढण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी यावेळेस कांद्याचे पीक घेतले होते परंतु बाजारात सध्या कांद्यांना अपेक्षित भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेले शेतकरी आणखीनच अडचणीत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने कांद्याला हमी भाव द्यावा, अशी मागणी होत आहे.

शेगाव तालुक्यात शेतकरी बांधवानी मोठया प्रमाणावर  कांद्याची लागवड झालेली होती. सध्या शेतकरी काढणीच्या कामात व्यस्त आहेत.  मात्र कांदा उन्हाळी काद्यांचे पीक जास्त असताना. प्रती क्विंटल 400 ते 500 रुपयांपर्यंतचा भाव सध्या मिळत आहे. कांदा लागवडीपासून मशागत, रोपे, खते, पाणी, मजुरी, वाहतूक, गोण्या, अडत, हमाली आदी सर्व खर्च पाहता, मिळणारा भाव समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमोडले आहे. पोटाला चिमटा देऊन कुटुंबासह सहा महिने शेतात राबराब राबणाऱ्या बळीराजाच्या कष्टाचे चीज होत नसल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आणले आहे. वाढत्या तापमानाचा दुष्परिणाम  गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. अशा वातावरणात कांदा चाळीतील कांदा सडण्याची शक्‍यता असल्याने बहुतांश शेतकरी कांदा चाळीत न ठेवता, बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत. मागीलवर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच सडला होता. त्यामुळे जो भाव मिळेल, त्या भावात विकून शेतकरी मोकळे होत आहेत.

शेतकऱ्याने केली कांद्याची लूट..

कांद्याला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क कांदा नागरिकांना मोफत वाटून अक्षरशा त्याची लूट केली शेगाव येथील माळीपुरा भागातील शेतकरी कैलास नारायण पिंपळे यांनी आपल्या शेतात उत्पादित झालेला कांदा परिसरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना मोफत वाटप केला यावेळी कांदा नेण्यासाठी मोठी झुंबड उसळली होती जवळपास दोनशे क्विंटल पेक्षा जास्त कांदा शेतकऱ्यांनी कांदा वाटप करून एक प्रकारे शासनाप्रति आपला रोज आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्यक्त केला आहे

कांदा चाळीचा लाभ आवश्यक.

कांदा उत्पादकांसाठी कांदाचाळ अनुदान देण्यात येते मात्र ज्यांना खरोखर कांदा चाळीची गरज आहे, अशा बऱ्याच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही अशी परिस्थिती शेगाव तालुक्यात आहे. कांदाचाळीची गरज पाहता, वंचित शेतकऱ्यांना त्याचा तातडीने लाभ देणे गरजेचे आहे.

– गजानन बोबडे शेतकरी चिंचोली

देशाचे पंतप्रधान शेतमालाला उत्पन्नास दुप्पट भाव देऊ शा पोकळ घोषणा नेहमी करतात मात्र शेतकर्‍यांना पिकाला चांगला भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च सुद्धा निघणे मुश्कील झाले आहे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याला सध्या मातीमोल भाव आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने हमी भावाने कांदा खरेदी सुरू करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल

-रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी