Home Breaking News तुमच्या मुलांना तर ! हे व्यसन नाही ना?

तुमच्या मुलांना तर ! हे व्यसन नाही ना?

91

राहुल निर्मळ, द रिपब्लिक न्यूज नेटवर्क

मुंबई:- वाढत चाललेल्या टेक्नॉलॉजी मुळे आपल्याला फायदा आणि नुकसान दोन्ही होत आहेत. या नुकसानीचे एक उदाहरण म्हणजे डिजिटल ड्रॅग, ज्या प्रमाणे लोक नशे साठी दारू ,चरस, गांजा, भंग घेतात त्याचप्रमाणे मानसिक समाधान मिळावा म्हणून डिजिटल ड्रॅग चा सहारा घेतल्या जात आहे. संपूर्ण दुनियेत युवा वर्गात या डिजिटल ड्रॅग घेण्याचा ट्रेंड वाढत आहे. याचा सरळ परिणाम माणसाच्या दिमागावर पडत आहे. याच्या धोक्याला समजण्यासाठी आणि याचे समाधान शोधण्यासाठी संपूर्ण जगातील शास्त्रज्ञ रिसर्ज करीत आहेत . या साठी फक्त हेडफोन, मोबाइल आणि इंटरनेट कनेक्शनचिच गरज असते.

काय आहे डिजिटल ड्रॅग
डिजिटल ड्रॅग ला बाइनॉरल बिट्स या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. ज्या प्रमाणे वेगवेगळ्या गाण्याच्या जश्या कॅटेगिरी असतात त्याच प्रमाणे बाइनॉरल बिट्स हा सुद्धा एक म्युजिक चा प्रकार आहे . याचा सरळ इफेक्ट एकणाऱ्याच्या दिमागावर होतो.

मेंदूवर याचा कसा असर पडतो
शात्रज्ञ म्हणतात की वेगवेगल्या फिक्वेन्सी मुळे बाइनॉरल बिट्स चा जास्त असर पडत असतो आणि हे लगतार ऐकल्याने दिमाग कन्फ्युज होतो त्यामुळे परिणाम मनुष्य मध्ये खोलवर जात राहतो त्यामुळे धिरे धिरे नशा वाढत राहते या धोक्याला समजण्यासाठी शास्त्रज्ञ यांनी 30 हजार लोकांवर रिसर्ज केले. न्यूजविक च्या रिपोर्ट नुसार युवा वर्ग सर्वात जास्त बाइनॉरल बिट्स ला ऐकत असतो . रिसर्ज सांगते की 30 हजार लोकांमधून 5.3 टक्के लोक बाइनॉरल बिट्स ऐकणे पसंत करत होते. यामधून 60 टक्के पुरुष होते ज्यांचे वय 27 वर्ष होती. त्यांना याचे वेगवेगळी कारणे दाखवली जशी 11.7 टक्के लोक असे होते जे ड्रॅग घेत होते आणि घेतलेल्या ड्रॅग च्या नशेत वाढ व्हावी म्हणून ते हे ऐकत होते. आणि काहीचे म्हणणे असे होते की हे ऐकल्याने स्वप्न दिसतात .
रिसर्ज नुसार 50 टक्के लोक रोज 1घंटा ऐकत असत तेच 12 टक्के लोक याला 2 घंटे ऐकने पसंत करीत असत

कोणत्या देशात डिजिटल ड्रॅग च्या केसेस जास्त आहेत

जगभरात या देशात डिजिटल ड्रॅग च्या केसेस जास्त आहेत त्यापैकी अमेरिका, ।एक्सिको, ब्राजिल, रोमानिया , पोलँड आणि ब्रिटन यामध्ये सहभागी आहे आणि आचर्याची गोस्ट म्हणजे यामध्ये युवा वर्गच नाही तर लहान मूल सुद्धा जात आहेत. त्यामुळे पालकांनी लवकरच जागरूक होणे गरजेचे आहे अन्यथा याचे खूप भयंकर परिणाम व्हायला काहीच वेळ नाही