Home Breaking News वीरशैव-लिंगायत समाजातील उर्वरित जातींना आरक्षण मिळण्यासाठी ;शिवा संघटनेचा पाठपुरावा: आयोगाने घेतली सुनावणी

वीरशैव-लिंगायत समाजातील उर्वरित जातींना आरक्षण मिळण्यासाठी ;शिवा संघटनेचा पाठपुरावा: आयोगाने घेतली सुनावणी

90

औरंगाबाद : शिवा संघटनेच्या मागणी पाठपुराव्यानुसार 2014 ला वीरशैव-लिंगायत समाजातील 21 जातींना आरक्षण मिळाले, आयत्या शेवटच्या वेळी श्रेय लाटण्यासाठी काही समित्यावाल्यांनी लुडबुड केल्याने समाजातील ज्यांच्या टिसीवर हिंदू लिंगायत व केवळ लिंगायत लिहिले आहे त्यांना आरक्षणापासुन या लोकांच्या चुकांमुळे वंचित रहावे लागले होते, त्या सर्वच उर्वरित 32 जाती उपजातींना ओबीसी, एसबीसी व एनटीचे आरक्षण मिळवण्यासाठी शिवा संघटनेने आरक्षणाचा दुसरा टप्प्यातील आपले प्रयत्न सुरू केले, मागासवर्ग आयोगाकडे शिवा संघटनेच्या सुनावण्यासुरू झाल्या (प्रकरण क्रमांक- 32/2014) मागासवर्ग आयोगाच्या कोर्ट समोर शिवा संघटनेच्या काही सुनावण्या झाल्या ज्या मध्ये शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर यांनी आपली बाजु अभ्यासपूर्ण भक्कमपणे मांडली, मधल्या काळात कोरोनामुळे थोडा त्रास झाला परंतु शिवा संघटनेचे प्रयत्न पाठपुरावा मात्र सातत्यपूर्ण सुरूच असल्यामुळेच राज्य मागासवर्ग आयोगाने शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर यांना पुढील सुनावणीसाठी आज दि.17 मे 2022 रोजी औरंगाबाद येथे बोलावले होते, आजच्या सुनावणी मध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निर्गुडे यांच्या सह मागासवर्ग आयोगाचे चार सदस्य त्यामध्ये श्री बी.एल सगर, श्री‌ किल्लारीकर, श्री अॅड. गोविंद काळे, श्री लक्ष्मण हाके, डॉ निलीमा सराफ लखाडे हे चार सदस्य आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव श्री डी.डी.देशमुख हे उपस्थित होते व शिवा संघटनेच्या वतीने लिंगायत ओबीसी आरक्षणाचे प्रणेते आदरणीय प्रा. मनोहरजी धोंडे सर व शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे एक तास चाललेल्या सुनावणीत शिवा संघटनेच्या वतीने आपण आपली भक्कम आणि सक्षमपणे बाजु मांडली आहे.

सुनावणीपुर्ण झालेली असुन यामध्ये उर्वरित जाती उपजातींना आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी लिंगायत ओबीसी आरक्षणाचे प्रणेते आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर यांनी अभ्यासपूर्ण व सक्षमपणे बाजु मांडल्यामुळे मागासवर्ग आयोग महाराष्ट्रातील वीरशैव-लिंगायत समाजातील उर्वरित जाती उपजांतींचा सर्वे करणार आहे. वीरशैव-लिंगायत समाजातील सर्वांनाच आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी यापुढे मागासवर्ग आयोगा सोबत शिवा संघटनेच्या सुनावण्या सुरूच राहतील. आज यशस्वीरीत्या शिवा संघटनेची मागासवर्ग आयोगा सोबत सुनावणी पुर्ण झाली, हिंदू लिंगायत या नोंद असलेल्या जातीसह वीरशैव-लिंगायत समाजातील उर्वरित 32 जातींचा समावेश ओबीसी, एसबीसी व एनटी प्रवर्गात करा या मागणीला अनुसरून शिवा संघटनेचीच केस राज्य मागासवर्ग आयोगा समोर सुरू आहे. प्रकरण क्रमांक-32/2014 यानुसार आरक्षण मिळवुन देण्याचे शिवा संघटनेचे काम सुरू आहे.
खरं तर दुर्दैवाने काही लोक चमकोगीरी करण्यासाठी व शिवा संघटनेच्या कष्टाचे अनेक वर्षांच्या प्रयत्न पाठपुराव्याचे श्रेय लाटण्यासाठी केवळ आयत्या शेवटच्यावेळी नौटंकी करून एक पानांचे निवेदनाचे नाटक करून फोटो व पेपरवर व सोशल मीडियात नाव येण्यासाठी चुकिचे निवेदने देऊन समाजाचे नुकसान करत आहेत. जे 2014 च्या आरक्षण वेळी शिवा संघटनेने अनेक वर्ष प्रयत्न पाठपुरावा व मागासवर्ग आयोगा सोबत सुनावण्याकरून आरक्षण मिळवले तेव्हाही शेवच्या टप्प्यात म्हणजे केवळ सहा दिवस आधी लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे आणि या धर्मातील अमुक अमुक जातींना आरक्षण द्या असे चुकिचे एक पानांचे निवेदन दिल्याने ज्यांच्या टिसीवर केवळ हिंदू लिंगायत व केवळ लिंगायत आहे त्यांना आरक्षणाला या श्रेय लाट्या समितीवाल्यानमुळे मुकावे लागले होते. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होत आहे, जेव्हा मागासवर्ग आयोगासमोर शिवा संघटनेच्या उर्वरित जातींना आरक्षण मिळण्यासाठी सुनावण्या सकारात्मकपणे सूरू असतांना केवळ श्रेय लाटण्यासाठी मधात मधात काही नौटंकी लोक करत आहेत यामुळे 2014 प्रमाणे समाजाचे नुकसान होईल, त्यामुळे शिवा संघटनेच्यावतीने या श्रेय लाट्या बांडगुळांना नम्र विनंती आहे की कृपया समाजाच्या होत असलेल्या भल्यात लुडबुड करून समाजाचे नुकसान करू नका. समाज बांधवांना ही नम्र विनंती आहे की यावेळी गाफिल राहु नका, लुडबुड करून समाजाचे नुकसान करणा-यांना वेळीच ओळखा. हे लोक केवळ बड्या बड्या बाता करतात परंतु पुरावा एकही न सादर करता जनु तेच समाजाचे लुडबुड करून आरक्षण मिळवून देत आहेत असे दाखवता, अशांना ओळखा व समाजाचे पुन्हा नुकसान होण्यापासून रोका.
केवळ श्रेय लाटण्यासाठी काही लोक पुन्हा 2014 प्रमाणे समाजाचे नुकसान झाले तरी केवळ स्वतःच्या प्रसिद्धी साठी नौटंकी करत आहेत,कुण्या मंत्र्यांची चमकोरी तर कुठे बनावट व खोट्या पोस्ट, तर कुठे एक पानांचे निवेदनाची दिखाऊ नौटंकी चालु आहे.
समाज बांधवांनो कलीयुग आहे खरे खोटे समझने अवघड असते परंतु आपली सद्सद्विवेक बुद्ध तर जागृत आहे आजवर नौटंकी करणा-यांनी एकही सक्षम पुरावा कधीच सादर केलेला नाही या उलट शिवा संघटनेने सुरूवातही केली प्रयत्न पाठपुरावा ही केला आरक्षण मिळवुन ही दाखवले व त्याचे वेळो वेळी सक्षम पुरावे सार्वजनिक सुद्धा केले आहे.