Home Breaking News ग्रामसेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत भाजपाचा एकतर्फी विजय; सर्व 13 जागांवर विजय

ग्रामसेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत भाजपाचा एकतर्फी विजय; सर्व 13 जागांवर विजय

92

 

भाजपा कार्यकर्त्यांनी संघटीत कृतीतून मिळविलेला विजय आहे- आमदार ॲड आकाश फुंडकर

खामगाव : 22 मे रोजी पिंप्री गवळी ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे मतदान पार पडले. या निवडणुकीत एकुण 146 पैकी एकुण 126 यामध्ये महीला राखीव 2, एससी राखीव 1 व ओबीसी राखीव1,एनटी राखीव 1 व सर्वसाधारण 8 अशा एकुण 13 जागांसाठी मतदान झाले व या सर्वच्या सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार निवडणुक आले व इतर सर्व पक्षांनी एकत्रीत लढून देखील सर्वांचा सुपडा साफ झाला व भाजपाची एकहाती सत्ता आली.

खामगांव मतदार संघातील विविध सेवा सोसायटीच्या निवडणुका सुरु आहेत यामध्ये मौजे पिंप्री गवळी येथे खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात भाजपाच्या 13 च्या 13 जागांवर उमेदवार निवडुण आले. सर्व समावेश व सबका साथ सबका विकास या घोषणेप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन भाजपाच्या कार्यकाळात गावाचा होत असलेला सर्वांगिण विकासाला गावकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला व भुलथापांना बळी न पडता भाजपाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी केले. यामध्ये चेतन फुंडकर, गजानन भोंबळे, अनिलसिंह पवार, राजेंद्र इंगळे, पुंडलिक इटिवाले, गजानन होगे, लक्ष्मण़ खेडकर,गजानन भातुरकर, प्रकाश बोंदडे, गजानन मोरे, दादाराव इंगळे, रेखा बुंदे, शालिनी कचाले हे विजयी झाले आहेत.

या निवडणुकीसाठी माजी आमदार यांनी जंग जंग पछाडत आपल्या पदाधिकाऱ्यांना पिंप्रीगवळीत आणुन बसविले, मतदारांच्या नातेंवाइकांकडून दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्ऩ केला, मोठया प्रमाणात धन शक्तीचा वापर केला त्यासोबतच मतदारांची पळवा पळवी देखील करण्यात आली. साम दाम दंड भेद सर्व वापरण्यात आले. भाजपा विरुध्द़, काँग्रेस, सेना,प्रहार व महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकत्र आले परंतु भाजपाने या सर्वांना पराभूत करुन धूळ चारली व पिंप्री गवळी ग्रामसेवा सोसायटीत एकहाती सत्ता मिळविली.

यासाठी भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहतन घेऊन संघटीतपणे काम करुन यश संपादन केले यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले की, भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा या सर्वपक्षीय आघाडीला उत्त़र देण्यास सक्षम आहे, हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे. या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दीक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. पिंप्री गवळी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबध्द़ आहोत.