Home क्राईम धक्कादायक! पोलिस महिलेवर अत्याचार; आरोपीही पोलिस कर्मचारीच

धक्कादायक! पोलिस महिलेवर अत्याचार; आरोपीही पोलिस कर्मचारीच

162

नारायण दाभाडे

बुलढाणा :  जिल्ह्यातील शेगावात खाकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे, एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार झाल्याची तक्रार शेगाव पोलिसात दिली आहे. तर आरोपी हा दुसरा तिसरा कोणी नसून तोही पोलीस कर्मचारी आहे. आरोपी विरुद्ध शेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आकाश सुरेश वाघमारे असे आरोपीचे नाव असून येथील तो रेणुका नगर वार्ड नं 12 शेगाव येथील रहिवाशी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय महिला ही 2011 पासुन पोलीस दलात महीला पोलीस शिपाई या पदावर प्रथम अकोला जिल्हा व गेल्या दीड महीण्यापासुन अमरावती आयुक्तालय मध्ये कार्यरत आहे. मुर्तीजापुर पोलीस स्टेशन येथे सन 2016 ते 2021 पावेतो कार्यरत असतांना आरोपी सोबत फोनवर बोलणे राहायचे. डिसेंबर 2021 मध्ये एके दिवशी आरोपीने पिडीतेला फोन करून एका प्रकरणात बोलायचे आहे, त्याकरीता तु शेगाव ला ये असा फोन करून शेगाव येथे बोलावले. डिसेंबरमध्ये 2021 दरम्यान 02:44 वाजता शेगाव येथील गजानन मंदिर परिसरातील एका लॉज घेवून गेले असता एका खोलीत जबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले, त्याच बरोबर अनैसर्गिकरित्याही संभोग केल्याचे तक्रारीत पिडीतेने म्हटले आहे.

त्यानंतर धमकी देत तु तुझे पतीला याबाबत सांगीतले तर तुला व तुझे पतीला जिवाने ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी हा पतीला झालेली घटना सांगेल या भितीने त्याचे विरुध्द तक्रार दिली नाही. परंतु आरोपीने दिनांक 30/05/22 रोजी पुन्हा फोन करून शरीर सुखाची मागणी केल्याने रिपोर्ट देत आहे अशा रिपोर्ट वरून गुन्हा दाखल दाखल केला आहे. आरोपी विरुद्ध अप नं- 243/2022 कलम 376, 377,506 भा. द.वि प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.