Home Breaking News • शिक्षकाच्या रिक्त जागेवर बेकायदेशीर नियुक्तीचा घाट; शासनाची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप...

• शिक्षकाच्या रिक्त जागेवर बेकायदेशीर नियुक्तीचा घाट; शासनाची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप • राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे दत्तात्रय समर्थ यांची तक्रार दाखल!

45
  1. • शिक्षकाच्या रिक्त जागेवर बेकायदेशीर नियुक्तीचा घाट; शासनाची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप
    • राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे दत्तात्रय समर्थ यांची तक्रार दाखल!

चंद्रपूर ◼️किरण घाटे ◼️
गडचिरोली जिल्ह्यातील सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ चामोर्शी अंतर्गत येत असलेल्या त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय मोहोर्ली (मो.)ता. चामोर्शी जिल्हा. गडचिरोली येथील एका शिक्षण संस्थेत रिक्त असलेल्या शिक्षकाच्या जागेवर नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करून शासनाची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. दिलीप गोपीनाथ नैताम मु. रश्मीपूर या शिक्षकाची सेवा समाप्त करून त्याच्या ठिकाणी बेकायदेशीर रित्या दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती करून त्यांची बनावट व बोगस शालार्थ आय डी काढून त्यांना वेतन देण्यात येत आहे.असे चौकशी अंती कळले मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून पुन्हा नियुक्ती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सदरहू प्रकरणातील दिलीप गोपीनाथ नैताम यांची आधीची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागेवर रमेश लचम्मा शेडमेक या शिक्षकांची सन:2021-2022 मध्ये बेकायदेशीर रित्या नियुक्ती करून बनावट व बोगस पद्धतीने शालार्थ आय डी तयार करून यांना पगार देणार येत असल्याचे समजते. रमेश लचम्मा शेडमेक यांची नियुक्ती बेकायदेशीर रित्या असतानाही ते अद्यापही त्या जागेवर हक्क सांगत असून, त्यांच्या आधीचे दिलीप गोपीनाथ नैताम हे कार्यरत होते दिलीप नैताम हे उच्च न्यायालय नागपूर येते याचिका क्र. WP 3543/2020 दाखल केली होती आणि ही माहिती दिनांक. 29/10/2020 रोजी मुख्याध्यापक. संस्थापक. शिक्षणाधिकारी माध्यमिक गडचिरोली तसेच उपसंचालक शिक्षण विभाग नागपूर यांना कळविण्यात आले होते कि माझी याचिका उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर येते दाखल आहे न्यायप्रविष्ठ आहे जोपर्यंत उच्च न्यायालय नागपूर याचे अंतिम निर्णय आदेश पारित होणार नाही तोपर्यंत माझ्या ठिकाणी कोणत्याही अन्य शिक्षकांची नियुक्ती करू नये. आणि करण्यात येऊ नये तसेच हे (पद )रिक्त ठेवण्यात यावे असे कळविण्यात आले होते तरी सुद्धा. मुख्याध्यापक. संस्थापक. शिक्षणाधिकारी माध्यमिक गडचिरोली आणि उपसंचालक कार्यालय नागपूर यांनी दुसऱ्या एका व्यक्तीची नियुक्ती करून त्या शिक्षकांची बोगस ठराव खोटी माहिती.कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती करण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक दिलीप गोपीनाथ नैताम यांनी सन २००९-१० पासून त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय मोहोर्ली (मो.)या शाळेत कार्यरत होते. मात्र, प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांची सेवा २१ डिसेंबर २०२० रोजी खंडित करण्यात आली होती. या बेकायदेशीर.निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणावर अंतिम निर्णय होईपर्यंत ती जागा रिक्त ठेवण्याचे आदेश दिले होते.आणि आपण मा. न्यायाधीकरन प्राधिकरण चंद्रपूर येते दाद मागावी असेही आदेश दिले होते .(मा. उच्च न्यायालय नागपूर यांनी दिले होते) त्या आदेशानुसार दिलीप गोपीनाथ नैताम यांनी मा. न्यायाधीकरन प्राधिकरण चंद्रपूर येते याचिका क्र. STC 01/2024 दाखल केली होती सदरहू याचिकेचा अंतिम निर्णय दिनांक 07/03/2025 ला अंतिम निर्णय देऊन त्या निर्णयात दिलीप गोपीनाथ नैताम यांना एक महिन्याच्या आत रुजू करून तीन महिन्याच्या आत 75% सर्व थकीत वेतन देण्याचे निर्णय/ आदेश मुख्याध्यापक. संस्थापक. शिक्षणाधिकारी माध्यमिक गडचिरोली यांना दिलेले आहे .तरी सुध्दा आज 14 महिने उलटले तरीही दिलीप गोपीनाथ नैताम यांना रुजू करून घेतलेले नाही . तद्वतच दिलीप नैताम यांचे थकीत वेतन काढण्यात आलेले नाही त्यामुळे दिलीप नैताम याचे कुटुंब खूप हालाकीचे जीवन जगत आहेत. असे समर्थ यांचे म्हणणे आहे.मुख्याध्यापक. संस्थापक. शिक्षणाधिकारी यांनी संगनमताने. प्रशासकीय स्तरावर हालचाली करून दिलीप नैताम याच्या रिक्त जागेवर रमेश लचम्मा शेडमेक या शिक्षकांची नवीन नियुक्ती करण्यासाठी खोटी माहिती सादर केली असल्याचा आरोप दत्तात्रय समर्थ यांनी केला आहे. शिक्षण उपसंचालक नागपूर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी गडचिरोली तसेच मुख्याध्यापक. संस्थापक यांना यासंदर्भात एकूण 50 पेक्षा अधिक पत्र.निवेदने. स्मरनपत्र वारंवार देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणात शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक. राजेश दादाजी ढुमने.आणि शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे तसेच उपसंचालिका माधुरी सावरकर तसेच उपसंचालक कार्यालयातील काही लिपिक व जबाबदार अधिकारी जाणीवपूर्वक व हेतूपूरस्पर जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून, आर्थिक हितसंबंधातून हा सर्व प्रकार सुरू असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. विशेष खेदाची बाब म्हणजे, रिक्त पदावर रमेश लचम्मा शेडमेक यांची बेकायदेशीर रित्या नियुक्ती करण्यासाठी खोट्या ठरावांचा खोट्या माहितीचा आणि कागदपत्रांचा वापर केला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या विरोधात आता तक्रारदार दत्तात्रय समर्थ आक्रमक झाले असून, त्यांनी सर्व पुराव्यांसह राज्याचे मुख्यमंत्री .देवेंद्रजी फडणवीस आणि पुण्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्याकडे रितसर दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. या तक्रारीमुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.