राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त उज्वला सोयाम यांचा चंद्रपूरात सत्कार
चंद्रपूर -किरण घाटे
येथील उज्वला सोयाम यांना राष्ट्रीय फ्लारेन्स नाइटिंगेल या राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांचे हस्ते सन्मानित करण्यात आल्याबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा चंद्रपूरच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तदवतचं त्यांच्या कार्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. भविष्यात त्यांच्याकडून उत्तम सेवेची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम, शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके नगरसेविका तथा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष सरला कुलसंगे ,प्रदेश सहसचिव भैय्याजी उईके जिल्हा कार्याध्यक्ष आनंद तिराणकर, जिल्हा महासचिव (मु ) अरविंद परचाके, चंद्रपूर शहर अध्यक्ष किशोर शेडमाके, महिला शहर सचिव वैशाली चांदेकर,शहर शहसचिव निलकंठ येरमे,जेष्ठ कार्यकर्त्यां कुसुमताई आळे, शाखा अध्यक्ष प्रकाश मेश्राम, सचिव जोगी नैताम, जेष्ठ कार्यकर्त्यां मीना गेडाम, सुशीला नैताम, अल्का उईके या सह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




