Home राज्य पालखी निघाली ! भक्तांसंगे गजानन माऊली निघाली!!

पालखी निघाली ! भक्तांसंगे गजानन माऊली निघाली!!

81

विठू नामाच्या जयघोषात आषाढीसाठी श्रीं ची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

पालखीबरोबर ७०० वारकरी पायीवारीत सहभागी ; पालखीचे ५३ वे वर्ष

दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा माऊलींचा पालखी सोहळा; भाविकांमध्ये उत्साह

शेगाव : नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे … ज्ञानोबा तुकाराम ,गणगण गणात बोते..असा जयघोष करत आषाढीसाठी श्रीं ची पालखी पंढरपूरकडे सोमवारी ६ जून रोजी मार्गस्थ होणार झाली आहे. श्रींच्या पालखीबरोबर ७०० वारकरी पायीवारी करत आहेत. पालखीचे यंदा ५३ वे वर्ष आहे.

दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा माऊलींचा पालखी सोहळा आज वैभवी ताटात मार्गस्थ झाला असून भाविकांमध्ये उत्साह दिसून आला. श्रींच्या पालखी सोहळ्याचा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी तसेच वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी रविवारी रात्रीपासूनच शेगावात भाविकांची गर्दी सुरू झालेली होती. सकाळी विधीवत पूजा आरती जाहली व त्यानंतर पालखी श्रींचे मंदिरातून पुढील प्रवासाला निघाली.

O

श्री संत गजानन महाराजांच्या पालखीला निरोप देण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते पालखीच्या सोबत अनेक भाविकांनी सुद्धा अकोला पर्यंत रविवारी सुरू केली आहे वाटेत तीन ठिकाणी श्रींच्या पालखीचे स्वागत होत आहे गेल्या दोन वर्षापासून खंड पडलेला पालखीसोहळा आज पुन्हा सुरू झाला नाही भाविकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला अभंगाचा मधुर आवाज , टाळ-मृदुंगाचा गजर असे आल्हाददायी चित्र आज पाहायला मिळाले भक्तिभाव भक्तीभावाचा हा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी होता.

दर्शन घेताना तहसिलदार समाधान सोनवणे, गणेश पवार

श्रीं ची पालखी शेगाववरून श्री क्षेत्र नागझरी मार्गे अकोला, वाडेगांव, पातूर, डव्हा, रिसोड, परभणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने एकूण ७५० किलोमिटर प्रवास करत आषाढ शु-९ शुक्रवार  ०८ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहचेल.१२ जुलै पर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा  मुक्काम राहील. आणि आषाढी एकादशी सोहळा व काला  आटोपल्यावर आषाढ शु. १५ बुधवार १३ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी  शेगांवकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल.३ ऑगष्ट रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल.  पंढरीचे वारकरी ते आधिकारी मोक्षाचे..पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग… पंढरीची वारी, आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत…पंढरीची वारी चुकू न दे हरी… अशा अनेक अभंगांमधून पंढरपूरच्या वारीचे महत्व अधोरेखित झालेले आहे वारकऱ्यांसाठी आस्थेचा विषय आहे. त्यामुळे घराघरात आज विठुरायाच्या भेटीची आस लागलेली दिसून आली पांडुरंग परमात्माच्या भेटीसाठी आतुर झालेले भक्त हरिनामाचा गजर करत श्रींच्या पालखी सोबत पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.

शेगाव संस्थानने जपली परंपरा

श्रीं च्या पंढरपूर पालखी पायदळ वारीचे यंदा ५३ वे वर्ष आहे.  श्री गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायदळ वारीची परंपरा कायम ठेवली आहे.या पालखी सोबत शेकडो वारकरी ,भाविक  पंढरपूरची वारी करत असतात.वारीमध्ये सहभागी सर्व वारकरी भक्त यांची सर्वोतोपरी व्यवस्था श्री संस्थान कडून करण्यात येते.

सुविधा व व्यवस्थेचे विशेष काळजी

मागील दोन वर्षापासून कोरोनाचे प्रभावामुळे व शासन निर्देशानुसार सदर वारीची परंपरा दोन वर्षे खंडीत होती. श्री पालखीचे मुक्कामाची जी गांवे आहेत, ती पुर्वी प्रमाणेच कायम राहतील.
श्री क्षेत्र शेगांव ते श्रीक्षेत्र पंढरपूर व पंढरपूर ते शेगांव या संपूर्ण १३०० कि.मी. चे पायी वारीचे प्रवासातील वारकरी व भाविकांची सुरक्षा आणि सुव्यवस्था आणि सर्वांच्या सोई लक्षात घेवून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.