Home विदर्भ माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष; राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ पाटील यांचा...

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष; राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ पाटील यांचा वाढदिवस साजरा

73

संगीतराव भोंगळ पाटील यांना शुभेच्छा देताना अंकुश कड व मित्र परिवार

तालुका प्रतिनिधी
संग्रामपूर -माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष; राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शेकडो चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री. भोंगळ पाटील यांचे अभिष्टचिंतन करण्याकरिता आज चाहत्यांनी त्यांच्या मूळ गावी पातुर्डा येथे गर्दी केली.

संग्रामपूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील एक गाजलेलं नाव आहे. जनसामान्यांसाठी धावून जाणारा भला माणूस अशी संगीतराव भोंगळ यांची ओळख आहे. श्री संगीतराव भोंगळ हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत तसेच सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचा विधानसभेचा भावी चेहरा म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिले जाते. आज भोंगळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संग्रामपुर तालुका तसेच जळगाव जामोद मतदारसंघातील चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती .

प्रत्यक्ष भेटून फोनवर, तसेच सोशल मीडियावर संगीतराव भोंगळ यांना शुभेच्छा देऊन कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला.

द रिपब्लिक कडून शुभेच्छा!


ऑन टाईम टुडे तथा द रिपब्लिकचे संपादक श्रीधर ढगे पाटील, द रिपब्लिकचे बुलडाणा आवृत्ती संपादक नारायण दाभाडे, डीजीटलचे वृत्त संपादक राहुल निर्मळ , लोकमतचे पत्रकार तसेच प्रेस क्लब शेगावचे अध्यक्ष  अनिल उंबरकार , पत्रकार संघाचे अध्यक्ष धनराज ससाने यांनी आज संगीतराव भोंगळ पाटील यांची भेट घेतली. वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध विषयांवर चर्चा सुद्धा केली