Home Breaking News डॉ. अजित जाधव यांचा माणुसकीला काळीमा… वाचा नेमकं काय घडलं

डॉ. अजित जाधव यांचा माणुसकीला काळीमा… वाचा नेमकं काय घडलं

122

पैशासाठी डॉक्टरांची रुग्ण पत्रकारासोबत असभ्य वागणूक ,
जळगाव(जामोद):- दि.६ डॉक्टर हे रुग्णांसाठी खरोखरच देव असतात, देवदूत असतात. पैशाची पर्वा न करता निस्वार्थपणे रुग्णांची सेवा करणारे डॉ.अभय आणि डॉ.राणी बंग, आनंदवन येथील आमटे कुटुंब यांनी तर आपल्या कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी अर्पण केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कित्येक डॉक्‍टरांनी पैशाला तिलांजली देऊन तदह्यात रुग्णसेवा केली. परंतु जळगाव (जामोद) वैद्यकीय पेशाला काळिमा फासणारा निंदनीय प्रकार दिनांक ६जून रोजी घडला. पोटात होणाऱ्या वेदनां असह्य झाल्यामुळे, रुग्ण तडफडत होता. त्रासामुळे वेदना असह्य झाल्याने त्यांना शहरातील डॉक्टर अजित जाधव यांचे रुग्णालयात पाठविण्यात आले आणि रुग्णालयात गेल्यावर रुग्णाने वैद्यकीय मदतीची याचना केली, परंतु डॉक्टरांच्या कंपाउंडरने अगोदर पैसे जमा करा, मगच काय ते उपचार होतील, अशी तंबी दिल्याने रुग्णाची तब्येत अधिकच खालावलेली.


हा प्रकार घडला जळगाव (जामोद) येथील दैनिक देशोन्नती चे शहर प्रतिनिधी विनोद चिपडे यांच्या बाबतीत. वेदना असह्य झाल्याने चिपडे हे संबंधित रुग्णालयात गेले. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष संजय पारवे आणि प्रहार जनशक्ती जिल्हा उपप्रमुख राजेश लहासे हेसुद्धा होते . विनोद चिपडे हे उपचारासाठी तळमळत असताना भर उन्हात साडेबारा ते एक च्या दरम्यान डॉक्टर मात्र उपचाराला टाळाटाळ करत होते. नंतर डॉक्टरांनी कंपाउंडर मार्फत उपचारापूर्वी पैशांची मागणी केली. संबंधित डॉ.जाधव यांनी सुद्धा कंपाउंडर च्या म्हणण्याचे समर्थन केले. विनोद पत्रकार असल्याने डॉ. जाधव यांनी पत्रकारानं बद्दल बद्दल सुद्धा असभ्य व उद्धटपणाची भाषा वापरून गैर शब्दाचा वापर केला. पोलीस तक्रारीची धमकी सुद्धा त्यांनी दिली. समाजात इतरांसाठी झटणाऱ्या पत्रकारांसाठी डॉक्टर अशा प्रकारची वर्तणूक करतात, तर मग सामान्य नागरिकांप्रति डॉक्टर कसे वागत असतील ?असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला. पैशासाठी संबंधित डॉक्टरांकडून असा प्रकार होणे ही गोष्ट लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. म्हणून दिनांक ६जून रोजी तालुका व शहरातील पत्रकारांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांचे नावे तहसीलदारांना निषेधाचे निवेदन सादर केले.असे प्रकार शहरात वारंवार घडू नये म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक यांनी नोंद घ्यावी व संबंधित डॉक्टरांना समज द्यावी, असे निवेदन सादर करून झालेल्या घटनेचा निषेध सुद्धा पत्रकार मंडळींनी केला.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देतेवेळी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष भीमराव पाटील प्रदेश कार्याध्यक्ष लियाकत खान प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा उपप्रमुख राजेश लहासे ,पत्रकार विनोद वानखडे ,विनोद चिपडे ,संपादक राहुल निर्मळ ,अनिल भगत ,अमर तायडे ,राजेश बाठे ,अश्विन राजपूत ,विठ्ठल गावंडे , एस. एम. फारुख, गुलाबराव इंगळे आदी सह तालुका व शहरातील पत्रकारांचा जाहीर निवेदन देतेवेळी उपस्थिती होती त्यांच्या वतीने नायब तहसीलदार मार्कंडेय यांनी निवेदन स्वीकारले