Home Breaking News संभाजी ब्रिगेड आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ८७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

संभाजी ब्रिगेड आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ८७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

91

शिवरायांच्या पुतळ्याचा जलाभिषेक,पूजन करून केली रक्तदानाला सुरुवात

नांदुरा : दरवर्षीप्रमाणे दि.६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील हे रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात.यावर्षी सुद्धा ६ जून २०२२ शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जलाभिषेक व पूजन केले व श्री संत सावता माळी भवन नांदुरा येथे रक्तदान शिबिरास सुरुवात केली.यावेळी ८७ रक्तदात्यांनी रक्तदान करून हे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, रा.वी.पत्रकार संघ नांदुरा शहराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल , पवन चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले,या रक्तदान शिबिराला मा.शिवश्री सचिन तायडे साहेब व त्यांच्या पत्नी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा शिवमती कोमलताई सचिन तायडे यांनी उपस्थिती लावली व रक्तदात्यांना बिस्किटाचा मोठा खोका भेट देत रक्तदान सुद्धा केले.सोबतच मा.श्री रमेश पाटील मा.शिवसेना तालुका प्रमुख तथा मा.कृषी उत्पन्न बाजार समिती साचालक नांदुरा यांनी व मा. पं. स.सभापती शिवाजीराव पाटील,तालुका आरोग्य अधिकारी स्नेहा पाटील मॅडम,अनीलभाऊ जांगळे उपस्थित होते.या कार्यक्रमात आर्थिक सहाय्य म्हणून नेत्राचिकीत्सक संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव डॉ शरद पाटील यांनी १००० रुपये व श्री अशोकराव घनोकार यांनी ५०० रुपयांची मदत केली.विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर इंगळे व पत्रकार संतोष तायडे साहेब यांनी पूर्ण वेळ दिला व रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल अमर रमेश पाटील संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नांदुरा तथा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष नांदुरा यांनी सर्व रक्तदात्यांचे,सहकारी मित्रांचे, व शासकीय चमू खामगाव यांचे आभार मानले. कार्यक्रम दरम्यान लोकांनी चांगल्या कार्याबद्दल प्रतोत्सहन दिल्यामुळे आणखी समाजकार्य करण्याची ऊर्जा मिळाल्याचे अमर पाटील यांनी म्हटले