Home Breaking News शाहू फुले आंबेडकर फाउंडेशन च्या वतीने १२एकल महिला विधवांना शेळ्यांचे मोफत वितरण...

शाहू फुले आंबेडकर फाउंडेशन च्या वतीने १२एकल महिला विधवांना शेळ्यांचे मोफत वितरण !

75

सहदेव वाकोडे, द रिपब्लिक न्युज नेटवर्क

लाखनवाडा :- कोविड१९ च्या महामारीमुळे कुटुंब उध्वस्त झाली महिला विधवा झाल्या बालकांचे पितृछत्र हरवले तर काही बालके अनाथ झाले अशांना विविध क्षेत्रातून मदत देऊन आधार देण्याचे कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे वखाण्याजोगे असल्याचे प्रतिपादन दिशा महिला फेडरेशनच्या अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश सचिव ऍड जयश्रीताई शेळके यांनी आज ६ जून रोजी घारोड ता खामगाव येथे केले पुणे येथील संध्या गोखले यांच्या पुढाकाराने शाहू फुले आंबेडकर फाउंडेशन च्या वतीन खामगाव तालुक्यात कोरोनामध्ये पतीचा मृत्यू झालेल्या १२ विधवा महिलांच्या कुटूंबाला आर्थिक हातभार लागावा या करिता या महिलांना मोफत शेळ्यांचे वितरण करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खामगाव तालुका मिशन वात्सल्य समन्वय समितीचे सचिव तथा एकात्मिक बाल विकास प्रकल्प श्री राजेश वाघ कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हा समन्वयक तथा मिशन वात्सल्य समन्वय समिती सदस्य सचिन ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेश सचिव धनंजय देशमुख, मिशन वात्सल्य समन्वय समिती सदस्य वैभव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष राहुल बापू देशमुख ,पशुधन वैद्यकीय अधिकारी शिंदे,पशुधन पर्यवेक्षक शेंगोकर,उपसरपंच भिकाजी इंगोले ज्येष्ठ समाजसेवक बाबुराव इंगोले, मो सय्यद भाई , यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना ऍड सौ जयश्री ताई शेळके म्हणाल्या की शाहू-फुले-आंबेडकर फाऊंडेशन ही संस्था covid-19 च्या महामारी मध्ये ज्या ज्या कुटुंबात मृत्यू झाला अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असल्यामुळे या कुटुंबांना फार मोठा आधार मिळत आहे या शेळ्या मधून या कुटुंबांना आर्थिक हातभार लागून त्यांच्या पालनपोषणासाठी मोठी मदत होईल त्यामुळे समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी अशा कामांमध्ये पुढे आले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शाहु-फुले-आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर महामानवांच्या कार्याचे स्मरण करून महाराज आपण समाजसेवा करत राहावी असे विचार मंचावरील मान्यवरांनी मांडले
त्यानंतर ऍड सौ जयश्री ताई शेळके , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव मा धनंजय देशमुख, कोरोना एकल पुनर्वसन समिती जिल्हा समन्वयक मा सचिन ठाकरे, वात्सल्य समिती सदस्य वैभव ठाकरे ,वात्सल्य समिती सचिव मा राजेश वाघ आदींसह मान्यवरांच्या हस्ते खामगाव तालुक्यातील १२एकल विधवा महिलांना मोफत शेळ्यांचे वितरण करण्यात आले
यामध्ये श्रीमती,तन्वीर दिलदार पठाण , सुरेखा हावरे कंचनपुर ,लाखनवाडा येथील श्रीमती प्रमिला गायकवाड , श्रीमती हाजरा बी इस्माईल शहा, घारोड येथील श्रीमती शोभना केणेकर श्रीमती आशा पाचपोर,तबसुम परवीन शे इरफान,श्रीमती नीता विभुते पारखेड,श्रीमती माधुरी इंगळे पळशी खुर्द,श्रीमती जिजा तिडके देऊळखेड शहापूर, वंदना इंगळे पळशी बु, एकल पालक हरवलेली अपंग विद्यार्थीनी कु रूपाली मानिक घटे, अशा एकूण १२ कुटुंबामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबात आर्थिक अर्थारजनासाठी मोफत शेळ्यांचे वितरण पार पडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन ठाकरे यांनी केले तर संचलन वात्सल्य समिती सदस्य वैभव ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन नितेश खरात यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील इंगोले ,अनिल गवइ, प्रवीण ठाकरे वसंता दुतोंडे सचिन दांदळे, संजय धोत्रे, जमीरखा पठाण, मंगेश कड, बिंबिसार इंगोले,गजानन इंगोले,शे जाफर,शे मुकत्तार, सईदभाई, सिदार्थ इंगोले, आदींनी अथक परिश्रम घेतले