Home Breaking News आधुनिक सत्यवान! हीच पत्नी पुढचे सात जन्म मला मिळावी, म्हणत नवरोबांनी केली...

आधुनिक सत्यवान! हीच पत्नी पुढचे सात जन्म मला मिळावी, म्हणत नवरोबांनी केली वटपौर्णिमा साजरी!

85

 

पुणे – जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आज महिला सर्वत्र वटपौर्णिमा साजरी करत आहेत आणि वटवृक्षाची पूजा करून पतीच्या सात जन्माची साथ मागत आहेत मात्र पुणे येथे नवरोबा सुद्धा पुढे आले आणि हीच पत्नी मिळावी म्हणुन वटपौर्णिमा साजरी करत पुजाही सुद्धा केली. हा प्रकाराची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

आधुनिक सावित्री तिच्या सत्यवानाला दीर्घ आयुष्य लाभो म्हणून वट पौर्णिमेला महिला वडाची पूजा करताना पाहावयास मिळते, पण हीच सावित्री पुढचे सात जन्म मला मिळावी, तिला दीर्घायुष्य मिळावे म्हणून कोणी पुरुष वडाची पूजा करताना दिसत नाहीत, मात्र पिंपरी-चिंचवड मध्ये काही सत्यवानाणी आपल्या सावित्री साठी वडाची पूजा केली आहे.

तुम्हाला थोडंस आश्चर्य वाटलं असेल. पण हे खर आहे. पिंपरी-चिंचवडच्या सांगवी परिसरात सत्यवान सावित्री साठी वडाची पूजा करताना दिसले. मानव हक्क समितीच्या वतीन या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळेच सावित्री ऐवजी सांगवी मध्ये अनेक सत्यवान वडाची पूजा करताना दिसले.

प्रत्येक महिला आपल्या पतीला वटवृक्षाप्रमाण आयुष्य लाभाव आणि सात जन्मी तोच नवरा मिळावा यासाठी वटसावित्रीची पूजा करते. मात्र या आधुनिक युगामध्ये स्त्री-पुरुष समानता आहे. असे म्हणताना स्त्रियां प्रमाणेच हाच सण पुरुषांना प्रत्येक जन्मी तिच पत्नी लाभावी, तिलाही दिर्घायुष्य लाभावे, यासाठी सत्यवानाणी आपल्या सावित्री साठी वडाची पूजा केली आहे.

वास्तविक पाहता वटपौर्णिमा हा महिलांचा सन आहे. पण स्त्री पुरुष समानतेच्या काळात स्त्रीयांना समानतेचा दर्जा देण्याच्या उद्देशान पुरुषांनी वडाची पूजा केल्याने महिला वर्गही पुरुषाच्या या उपक्रमाच कौतुक करत आहेत.

अशी बायको नको म्हणत उलट्या प्रदक्षिणा

दुसरीकडे या उलट औरंगाबादेत वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पुरूषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे. पुढील ७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको, अशा घोषणा देत औरंगाबादेत पुरूषांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या 108 प्रदक्षिणा घालत पूजन केले आहे. औरंगाबादेतील वाळूज परिसरात पत्नी पीडित पुरूषांनी ही अनोखी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे.