Home चंद्रपूर विध्यार्थांमध्ये स्पर्धा परीक्षा बद्दल जागर व्हावा- PSI मूसळे

विध्यार्थांमध्ये स्पर्धा परीक्षा बद्दल जागर व्हावा- PSI मूसळे

121

• विध्यार्थांमध्ये स्पर्धा परीक्षा बद्दल जागर व्हावा- PSI मूसळे

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

वरोरा: तालुक्यातील शेगांव (बू)येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालया मध्ये ‘युवा जागर’ हा प्रेरणादाई कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थाना स्पर्धा परीक्षेचे महत्व आजच्या या युवा पिढीला किती आहे व यातून ग्रामीण भागातील विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेत कसा पास होईल या बद्दल ची माहिती कार्याक्रमचे प्रमुख पाहुणे सचिन मुसळे साहेब PSI पो.स्टे.वरोरा यांनी विद्यार्थांना दिली. या कार्याक्रमचे अध्यक्ष .प्रा.संजय खेडीकर तसेच प्रमुख पाहुणे प्रा.विजय वारे उपस्थित होते.मुसळे साहेबांचे स्वागत प्रा.वारे सरांनी केले .या कार्याकमाचे संचालन प्रा.झाडे सरांनी केले व आभारप्रदर्शन प्रा . खिरटकर यांनी केले. विद्यार्थांमध्ये स्पर्धा परीक्षेबाबत नव चैतन्य निर्माण होण्यासाठी आत्मविश्वास,मेहनतीचे धडे .मूसळे साहेबांनी दिले. या कार्यक्रमाला प्रा.हटवार,प्रा.शेख उपस्थित होत्या.

ग्रामीण भागातील ३५० विदयार्थी संख्या असलेले नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थांसाठी मार्गदर्शन व्हावे या साठी नेहमीच विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलाविण्यात येते.