• एकोना गावाचे पुनर्वसन करा :सरपंच गणेश चवले
• कोळसा खाणी मुळे गावकरी त्रस्त.
सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर
वरोरा : तालुक्यातील एकोना, चरुरखटी, मार्डा, वनोजा या गावाची जमीन वेकोली ने अधिग्रहित करण्यात आली.व खुली कोळसा खाण सुरू झाली. खदाणीत होत असलेले स्फोट,व कोळसा वाहतुकीमुळे होत असलेले प्रदुषण यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून गावाचे पुनर्वसन न केल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा एकोना चे सरपंच गणेश चवले यांनी दिला आहे.
एकोना गावातील शेतकरी यांच्या उर्वरित जमिनी अधिग्रहित करून तात्काळ गावाचे पुनर्वसन करावे, गावांसाठी रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.माढेळी रोडवरील देवरा नाला ते एकोना पर्यंत वेकोलीने सिमेंट रस्ता तयार करुन त्याची उंची वाढविण्याची गरज असुन कोळसा वाहतुकीमुळे गावकरी यांचा अपघात झाल्यास त्याच्या भरपाईची रक्कम निश्चित करावी. प्रदुषन होऊ नये यासाठी कोळसा वाहतुक करतांना ताडपत्री चा वापर करावा, एकोना गावातील बेरोजगारी कमी करून तात्काळ रोजगार द्यावा.
सिएसआर फंडातून गावातील विकासकामे करावी. खदानित स्फोट होत असल्याने गावातील घरांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी. एकोना थांब्यावर बस थांबविण्यासाठी तसेच पिण्याच्या शुद्ध पाण्याची करावे.कोळसा वाहतूक माढेळी ऐवजी अन्य मार्गाने करावी. गावकर्यासाठी सिमेंट रस्ता तयार करण्यात येऊन त्यावर स्टिटलाईट लावण्यात यावे. खदाणिमुळे आरोग्य वर विपरीत परिणाम होऊन मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई द्यावी.इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. बेमुदत उपोषण मध्ये गावातील नागरिकांचे जिविताला धोका निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी वेकोलिची असेल असे सरपंच गणेश चवले यांनी म्हटले आहे.