Home Breaking News News @chandrapur dist राज्यस्तरीय गोल्ला – गोलकर (यादव) समाजाच्या महामेळाव्याची जय्यत तयारी...

News @chandrapur dist राज्यस्तरीय गोल्ला – गोलकर (यादव) समाजाच्या महामेळाव्याची जय्यत तयारी “हा” मेळावा समाज बांधवांनी उत्स्फुर्तंपणे सहभागी व्हावे अजय मॅकलवार यांचे आवाहन! कार्यकमाचे उद्घाटक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार राहणार

144

News @ chandrapur dist

• राज्यस्तरीय गोल्ला – गोलकर (यादव) समाजाच्या महामेळाव्याची जय्यत तयारी

• “हा” मेळावा समाज बांधवांनी उत्स्फुर्तंपणे सहभागी व्हावे अजय मॅकलवार यांचे आवाहन!

• कार्यकमाचे उद्घाटक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार राहणार

सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)

चंद्रपूर:गोल्ला-गोलकर,गोल्लेवार-यादव समाज संघटना जिल्हा चंद्रपूरच्या वतीने येत्या ३०ऑंक्टोंबर २०२२ ला सकाळी ११ वाजता स्थानिक राजीव गांधी सभागृह, (जंयत टाॕकीज जवळ ,चंद्रपुर )येथे भव्य राज्यस्तरीय उपवर-उपवधु परिचय मेळावा तथा गुणवंत विद्यार्थी‌ वर्गांचा गौरव सोबतच समाजातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी वर्गांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

आयोजित कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे लाभणार आहे.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ समाजसेवक गणपतराव बुर्रीवार हे विभूषित करणार आहे.

या होवू घातलेल्या भव्य मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून चित्रपट निर्माते तथा साई वैकुंठ ट्रस्ट आदिलाबाद तेलंगाणाचे रविकिरण यादव ,नामदेवराव आयलवाड, क्रिष्णाजी यादव नागपुर ,प्रकाशराव मॅकलवार यवतमाळ ,श्रीरामजी गालेवाड मनोहरजी बोदलवार पुरुषोत्तम कोमलवार,श्रीनिवास जल्लेवार डाॕ.भास्कर बहिरवार,दिगांबर जंगीलवाड ,,दिगांबर करेवाड, सुनिल उट्टलवार, प्राचार्य साईनाथ आदर्लावार, भास्कर नन्नावार,संतोष मंथनवार ,आंनद विरय्या, यशवंत दंडीकवार,आशिष कावटवार ,मलन्नाजी बुरमवार सोमेश्वरजी पाकेवार आदीं मान्यवर मंडळींची उपस्थिती राहणार आहेत.

राज्यस्तरीय महामेळाव्याला महाराष्ट्रातील गोल्ला- गोलकर, गोल्लेवार-यादव समाजबांधवांनी मोठ्या संंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अजय मॅकलवार, उपाध्यक्ष दिलीप मॅकलवार, किरण चेनमेनवार, सचिव महेश मॅकलवार, कोषाध्यक्ष कृष्णाजी दाऊवार , सहसचिव शंकर मद्देलवार, श्यामराज भंडारी, संघटक प्रविण भिमणवार तसेच संपुर्ण कार्यकारणी सदस्यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे. दरम्यान समाजातील महिला पदाधिकारी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.