Home Breaking News Chandrapur city news ऑनलाईन क्रिकेट जुगारासह सुरु असलेल्या अन्य अवैध व्यवसायांवर प्रतिबंध...

Chandrapur city news ऑनलाईन क्रिकेट जुगारासह सुरु असलेल्या अन्य अवैध व्यवसायांवर प्रतिबंध घाला ! आ. किशोर जोरगेवारांनी पोलिस प्रशासनाला दिल्या सुचना नव्या पोलिस अधिक्षकांची आ.जोरगेवारांनी घेतली भेट

182

Chandrapur @city news

ऑनलाईन क्रिकेट जुगारासह सुरु असलेल्या अन्य अवैध व्यवसायांवर प्रतिबंध घाला !

आ. किशोर जोरगेवारांनी पोलिस प्रशासनाला दिल्या सुचना

नव्या पोलिस अधिक्षकांची आ.जोरगेवारांनी घेतली भेट

चंद्रपुर:जिल्ह्यातील दारुबंदी उठल्या नंतर दारुबंदी व्यवसायात गुंतलेले गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांनी इतर अवैध व्यवसाय सुरु केलेले आहे. त्यात प्रामुख्याने ऑनलाईन क्रिकेट जुगार चालविण्या-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे युवा वर्ग यात गुंतल्या गेला असुन अनेकांनी आर्थिक नुकसानी कारणास्तव आपली जीवन यात्रा संपविली आहे.अलिकडेच आत्महत्या सारखे प्रकार केल्याचे समोर आले आहे. या बाबी कडे गांभिर्याने लक्ष वेधून जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर प्रतिबंध घालावा अश्या महत्वपूर्ण सुचना चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांना आज केल्या आहे.

रविंद्रसिंग परदेशी हे चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पोलिस अधिक्षक म्हणून रुजु झाले आहे. दरम्यान आमदार जोरगेवार यांनी त्यांची भेट घेत सदरहु सुचना केल्या या वेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, घूग्घुस शहर संघटक विलास वनकर, अल्पसंख्याक विभागाचे शहर युथ अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक विश्वजीत शाहा आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूरात अवैध व्यवसायाने परत एकदा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ऑनलाईन सट्टा, सट्टापट्टी, जुगार, क्रिकेट जुगार, अवैध वाहतुक, सुगंधीत तंबाखु या सारखे अनेक अवैध व्यवसाय जोरात फोफाऊ लागले आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम कायदा सुव्यवस्थेवर देखिल निर्माण झाला आहे. चंद्रपूरातील दारु बंदी उठल्या नंतर अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अशा व्यवसायात गुंतल्या गेलेले आहे. या शिवाय याच जिल्हात ड्रग्स व गांजा विक्रीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा व्यवसायांवर अपेक्षीत अशी कारवाई होतांना मात्र दिसत नाही. राज्यात निर्बंध असलेल्या सुगंधीत तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याच्या सुचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी केल्या आहे. क्रिकेटवर ऑनलाइन जुगार खेळणा-यांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. अश्यांना सहज रित्या जुगार लावण्याचा मोबाईल अॅप्स उपलब्ध होत आहे. सदरहु अॅप्स उपलब्ध करुन देणा-यां बुकींवर पोलिस प्रशासनाने लक्ष ठेवून कारवाई करण्याचे देखिल आमदार जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांना सांगितले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पुष्प गुच्छ देत नव्या पोलिस अधिक्षकांचे स्वागत करण्यात आले.