Home कृषी Ballarpur @taluka news बल्लारशाह पावर हाऊस परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा ...

Ballarpur @taluka news बल्लारशाह पावर हाऊस परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा तहसीलदार डाँ. कांचन जगताप यांच्या हस्ते उदघाटन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती

801

Ballarpur@ taluka news

• बल्लारशाह पावर हाऊस परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा

• तहसीलदार डाँ. कांचन जगताप यांच्या हस्ते उदघाटन

• ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती

सुवर्ण भारत:रेखा चंडाले

बल्लारपुर शहर प्रतिनिधि

विसापूर – बल्लारशाह जुन्या पावर हाऊस परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे कार्यालय आहे. जुन्या विश्रामगृह इमारतीच्या या कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. परिणामी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. ही अडचण दूर करून जुन्या पावर हाऊस परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण केली. याचे उदघाटन बल्लारपूर येथील तहसीलदार डाँ. कांचन जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे विद्युत पारेषण कंपनी, कार्यकारी अभियंता कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्युत पारेषण कंपनीचे कार्यकारी अभियंता हरिश्चन्द्र बालपांडे होते, तर उदघाटक म्हणून तहसीलदार डाँ. कांचन जगताप, प्रमुख अतिथी म्हणून विसापूर ग्रामपंचायत सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गेडाम, लिपिक संतोष निपुंगे, विद्युत पारेषण कंपनीचे अधिकारी एस. पी. कामडे, आर. के. मेनेवार, वर्षा हेलवडे, सीमा पिंपळशेंडे, आर. टी. कोसे, व्ही. डी. रामटेके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यकारी अभियंता एच. एस. बालपांडे म्हणाले, आमच्या कार्यालय परिसरात तीव्र पाणी टंचाई होती. मागील काही दिवसापासून टंकरने पाणी मागवावे लागत होते. या संदर्भात या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न फळाला आले. आमच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे सांगितले. दरम्यान कार्यकारी अभियंता हरिश्चंद्र बालपांडे यांच्या हस्ते तहसीलदार डाँ. कांचन जगताप, सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, मंगेश राजूरकर यांचा शाल व पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन व्ही. डी. रामटेके यांनी केले.