Home Breaking News Varora@ taluka news डॉ. विकास आमटे यांचा अमृत महोत्सवी भव्य सत्कार...

Varora@ taluka news डॉ. विकास आमटे यांचा अमृत महोत्सवी भव्य सत्कार आनंदवनात विविध कार्यक्रमाचे आयोजन

109

Varora@ taluka news

•डॉ. विकास आमटे यांचा अमृत महोत्सवी भव्य सत्कार

•आनंदवनात विविध कार्यक्रमाचे आयोजन

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर

तालुका प्रतिनिधि वरोरा

वरोरा : महारोगी सेवा समिती, आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या वयाला ७५ वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्त त्यांचा आनंदवन मित्र मंडळ महाराष्ट्र व डॉ. विकास आमटे अमृत महोत्सव सत्कार समितीच्या वतीने आनंदवन येथे येत्या ८ नोव्हेंबर २०२२ रोजी भव्य सत्कार समारंभ आयोजित केल्या जाणार आहे. अशी माहिती संयोजक नरेंद्र मेस्री, दगडू लोमटे, शकील पटेल,अजय स्वामी व आयोजन समितीच्या इतर सदस्य यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मा. विकास सिरपूरकर यांच्या हस्ते व डॉ.प्रकाश आमटे, डॉ. मंदाताई आमटे, डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे. डॉ. विकास आमटे यांच्या कार्यावर गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. सोबत संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहून गौरव निधी अर्पण करणार आहेत.
कार्यक्रम पत्रिकेनूसार सकाळी ९ वाजता ७५ देशी प्रजातींचे वृक्षारोपण,१० वाजता सत्काराचा मुख्य कार्यक्रम , दुपारी ३ वाजता आनंदवन मित्र मेळावा आयोजित केला असून त्यात उपस्थित आनंदवन मित्र आपले मनोगते मांडतील. ५ वाजता आनंदवन निर्मित स्वरानंदवन हा कार्यक्रम तर रात्री गझल गायक भीमराव पांचाळे यांच्या मराठी, हिंदी व उर्दू गझल गायनाचा कार्यक्रम होईल.अशी माहिती संयोजक समितीकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून दीली आहे. समस्त आनंदवन मित्रांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे.