Home Breaking News Gadchiroli@ jilha dist news इंदाराम येथे अनोखा सामूहिक तुलसी विवाह :...

Gadchiroli@ jilha dist news इंदाराम येथे अनोखा सामूहिक तुलसी विवाह : चार जोडपेही अडकले विवाहबंधनात..!

112

Gadchiroli @ jilha dist news

• इंदाराम येथे अनोखा सामूहिक तुलसी विवाह : चार जोडपेही अडकले विवाहबंधनात..!

अहेरी :- तालुक्यातील इंदाराम येथील हनुमान मंदिरात गुरु माऊली भजन मंडळ,काकड आरती सेवा समिती, तुळशी विवाह समिती वतीने काकड आरती व तुळशी विवाह उत्सव सोहळा थाटात पार पडला.

यावेळी चार गरीब कुटुंबातील जोडपेही विवाह बंधनात अडकले. दरम्यान माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व माजी प. स. उपसभपती सोनालीताई कंकडालवार यांनी मदतीचा हात पुढे करत जोडप्यां जीवनावश्यक संसारउपयोगी भेट वस्तू दिली.

अश्विन शुद्ध पौर्णिमेला काकड आरतीचे सुरुवात झाली प्रती दिवस प्रभात समयी मंगलमय वातावरणात मंदिरात मोठया श्रद्धेने भजन,सत्संग, अभंग, गौळणी, काकड आरती नित्य नियमाने करत असतात. या मासिक कार्यक्रमाचे सांगता कार्तिक शुद्ध पौर्णिमेला होते.काल ७ नोव्हेंबर ला तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करून भजन, सत्संग काकड आरती करून पांडुरंगाची पालखी चे संपूर्ण गावात ढोल ताशे, फटाक्याच्या निनादात भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणूक यात्रा काढण्यात आली.त्या नंतर गोरज मुहूर्तावर तुळशी विवाह भट पुरोहित व्येकंटेश कोत्तावडलावार यांच्या मंत्रोपच्चाराने माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व माजी प. स. उपसभपती सोनालीताई कंकडालवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून तुळशी विवाह संपन्न करून गोपाळकाला करण्यात आले.सदर कार्यक्रमात गावातील अतिगरीब चार जोडप्याचे लग्न लावून त्यांना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून संसारपयोगी भेटवस्तू देऊन एक सामाजिक दायित्व निभावले व महाप्रसाद वितरण करण्यात आले.काकड आरती, तुळशी विवाह व लग्न सोहळ्याला हजारोंच्या संख्येने महिला पुरुष भाविकाची गर्दी उसळली होती.

कार्यक्रम यश्वीतेसाठी गुरू माऊली भजन मंडळाचे
श्रीनिवास कोत्तावडलावर अध्यक्ष, वसंत मेश्राम उपाध्यक्ष,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, इंदाराम ग्रामपंचायतचे सरपंच वर्षाताई सिडाम, इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभवभाऊ कंकडालवार,शंकर चकनारपवार, पद्मनाभम कविराजवार, रोहीत कोत्तावडलावार, किशोर तेलंगे, नागेश औतकर, गणेश पोगूलवार, विनोद औतकर, साईनाथ गोमासे, श्रीनिवास रेपाकवार, अविश दुर्गे, शुभम औतकर, छगन आत्राम व काकड आरती समितीचे वैभव कंकडालवार, सुरेश मेश्राम, नितीन मेश्राम, बालचंद्र मेश्राम, कोटेश्वर कोत्तावडलावार, अमर औतकर, बापूजी औतकर, कमलाकर हजारे, श्रीनिवास तेलंगे, तिरुपती रामगिरकर, अजय कुळमेथे, नरेंद्र दुर्गे, संतोष पुसलवार, महेश बावणे, उपेंद्र हजारे, रोशन सामलवार, स्वप्नील काटेल, विश्वजीत मेश्राम, व्येंकटेश औतकर, प्रकाश कोसरे. आणि भजन मंडळी चे सर्व सदस्य उपस्थित होते.