Home कृषी Chandrapur@ news चंद्रपूरात दिव्यांग मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन! शिबीराला दिव्यांग बांधवांचा...

Chandrapur@ news चंद्रपूरात दिव्यांग मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन! शिबीराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! ना.त.डाॅ.जितेंद्र गादेवार यांची उपस्थिती

292

Chandrapur@ news
• चंद्रपूरात दिव्यांग मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन!

• शिबीराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

• ना.त.डाॅ.जितेंद्र गादेवार यांची उपस्थिती

सुवर्ण भारत: किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)

चंद्रपुर: भारत निर्वाचन आयोग यांच्या निर्देशानुसार मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चंद्रपूर, तसेच दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र नागपूर,चंद्रपूर विभाग यांचे संयुक्तिक विद्यमाने आज शनिवार दि .१२नोव्हेंबरला दुपारी १वाजता शहराच्या मुख्य मार्गावर वरील पठाणपूरा येथे दिव्यांग मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्थानिक तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार डॉ.जितेन्द्र गादेवार प्रामुख्याने लाभले होते.

त्यांनी आपल्या भाषणातून मोलाचे मार्गदर्शन करीत या आयोजित शिबीराचा उद्देश्य व त्याचे महत्त्व काय आहे हे उपस्थितीतांना या वेळी समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण निवडणूक समन्वय अमर श्रीरामे यांनी केले. विचार मंचावरती दिव्यांग कौशल्य विकास संस्थेचे अध्यक्ष निलेश पाझारे, राष्ट्रीय दृष्टीहीन संघचे सचिव भारत पचारे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सचिन हेडाऊ आदीं उपस्थित होते.

आज पार पडलेल्या या कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांची उपस्थिती उल्लेखनीय अशीच होती . याच शिबीरात निलेश पाझारे , सचिन हेडाऊ यांची या प्रसंगी मार्गदर्शन पर भाषणे झाली. सदरहु शिबीर यशस्वी करण्यासाठी कल्पना शिंदे, दर्शना चाफले, कल्पना ब्राह्मणे, भाग्यश्री कोलते, कैलास ब्राह्मणे, रवींद्र उपरे, राजेश चव्हाण, शाबीर शेख, जयकुमार पवार तसेच दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

दरम्यान शासनाच्या या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले आहे.