Home चंद्रपूर chandrapur@city news चंद्रपूर मनपाने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत आझाद गार्डन योग...

chandrapur@city news चंद्रपूर मनपाने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत आझाद गार्डन योग नृत्य परीवाराचा उत्स्फुर्तं सहभाग ! समाधी वार्ड झाले चकाचक

281

chandrapur@city news

चंद्रपूर मनपाने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत आझाद गार्डन योग नृत्य परीवाराचा उत्स्फुर्तं सहभाग !

समाधी वार्ड झाले चकाचक

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)

चंद्रपुर:चंद्रपूर महानगरपालिकेकडून आयोजित केलेल्या स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धेत योग नृत्य आझाद गार्डन टीमने आपला सहभाग नोंदविला असून गोविंद स्वामी मंदिर परिसर व समाधी वॉर्ड येथे स्वच्छता मोहीम नुकतीच राबविण्यात आली आहे.

दरम्यान स्थानिक समाधी वार्ड येथे असलेले गोविंद स्वामी मंदिर हे गोंडकालिन पुरातन मंदिर आहे. मात्र दुर्लक्षित असल्याने या गोंडकालिन पुरातन मंदिराची अवस्था चांगली नव्हती.

आझाद गार्डन योग नृत्य टीमच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी मंदिराचा कायापालट करण्याचे मनाशी ठरविले. गोपाल मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या शहरातील मुग्धा खांडे यांनी आपली 53 लोकांची टीम घेऊन स्वच्छता मोहीम या भागात आरंभ केली आहे.एव्हढेच नाही तर कचरा वर्गीकरण व प्लाॅस्टिक मुक्त चंद्रपूर होण्या करिता त्यांचे टीमच्या वतीने जनजागृती रॅली ही काढण्यात आली.

या भागातील नागरिकांचा सदरहु मोहीमेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी आमचे प्रतिनिधीस आज एका भेटी अंती सांगितले
स्वच्छतेची स्पर्धा घेण्यासाठी व स्वच्छता कार्यात सर्व सामाजिक संस्थांद्वारे लोकसहभाग वाढविण्याची संधी दिल्याबद्दल संघ प्रमुख मुग्धा खांडे यांनी आझाद गार्डन योग नृत्य परिवारातर्फे चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहे.या मोहिमेत प्रत्यक्ष रित्या शहरातील सुपरिचित सामाजिक कार्यकर्त्या मुग्धा खांडे, गोपालजी मुंदडा, मीना निखारे,मयुरी हेडाऊ, रवी निखारे, आकाश घोडमारे, पुनम पिसे, सूरज घोडमारे, बाळकृष्ण माणुसमारे, विनोद कामनवार, अलका गुप्ता, साहिल चौधरी, संतोष पिंपलकर या शिवाय टीमच्या अन्य पदाधिकारी व सदस्यांची आपला सहभाग नोंदविला आहे. आयोजित ही मोहीम यशस्वी करण्यासाठी टीमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहे. सध्या तरी समाधी वार्ड या मोहिमेमुळे चकाचक झाल्याचे दृष्टीक्षेपात पडत आहे.