Ballarpur@city news
•जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे बालक दिन साजरा
सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर
बल्लारपुर:स्थानिक जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: १४नोव्हेंबर २०२२ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी.बी. भगत उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बी. पी. चिकाटे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तसेच प्रमुख उपस्थिती एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक आणि यु. के. रांगणकर सर विज्ञान शिक्षक यांची होती.
प्रथमता: स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोला उपस्थित मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. मंचावर उपस्थितांना गुलाबकळी देऊन स्वागत करण्यात आले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनपटावर शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी रूपाली मनोज निमकर, कुमारी त्रिशाली पप्पू महानंद, कुमारी राशी राहुल वेले, कुमारी रिताली भीमराव गवई, कुमारी सिया बाळू देवगडे, कुमारी आनंदी अनिल गवई, कुमारी महेक अफ्रीन अब्दुल रहमान यांनी आपल्या माहितीतून प्रकाश टाकला.
बालक दिनाचे औचित्य साधून मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीझकिड्स कार्निवल पुणे सप्टेंबर २०२२ फेस २ कलर विझार्ड मध्ये तृतीय क्रमांक आलेली विद्यार्थिनी कुमारी महेक अफ्रीन अब्दुल रहमान हिचा प्रमाणपत्र, पदक व गुलाबकळी देऊन गौरव करण्यात आला. कुमारी राशी राहुल वेले, कुमारी रूपाली मनोज निमकर व कुमारी त्रिशाली पप्पू महानंद यांना रिसाइट इट मध्ये भाग घेतल्यामुळे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी २०२२ मध्ये शाळेतर्फे भाग घेतलेला विद्यार्थी साहिल कवरपाल डुलगच याला प्रमाणपत्र आणि गुलाबकळी देऊन गौरविण्यात आले तसेच दिनांक: १४नोव्हेंबर २०२२ रोजी वाढदिवस असलेला शाळेचा विद्यार्थी अथर्व नितेश हिकरे याला
गुलाबकळी देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बी. पी. चिकाटे सर यांनी सांगितले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गावर वाटचाल करावी. यु. के. रांगणकर सर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात यशस्वी भरारी घ्यावी. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांत काहीतरी सुप्त गुण दडलेले असतात.एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांनी सांगितले की, पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे जनक होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. बी. भगत सर मुख्याध्यापक यांनी सांगितले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इतिहासाला रचले आहे.
त्यासाठी कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आदर्श जीवन चरित्र अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण त्यांचा जन्मदिवस बालक दिन म्हणून साजरा करीत आहोत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन सौ. एस. एन. लोधे आणि आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण सर यांनी केले.
कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जगदीश कांबळे,वाल्मीक खोंडे, वामन बोबडे, सुरेश मोरे, इंद्रभान अडबाले आणि विद्यार्थी गण उपस्थित होते.