Chandrapur @ city news
• चंद्रपूर जिल्ह्याचे नवे शल्य चिकित्सक म्हणून डॉ बंडूजी रामटेके यांची निवड
सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर
चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांची बदली नागपूर येथे झाल्याने त्याचा जागी आता चंद्रपूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित शल्य चिकित्सक म्हणून डॉ. बंडूजी रामटेके यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. बंडूजी रामटेके यांनी यांचा आधी वर्धा, चंद्रपूर, मुल येथे वैद्यकीय अधिक्षक म्हणून यशस्वी पणे कामकाज सांभाळलेले आहे. तसेच कोरोणा महामारी सारख्या काळात त्यांनी अतिशय योग्य प्रकारे कामगिरी बजावली आहे. व त्यांना मानवाधिकार साहयता संघ भारत यांच्या वतीने त्याच्या उकृष्ठ कामगिरी बद्दल त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.