Home विदर्भ Chandrapur@city news मायाताई कोसरे -मेघा धोटे ह्या सहजं सुचलंची शान -रंजू...

Chandrapur@city news मायाताई कोसरे -मेघा धोटे ह्या सहजं सुचलंची शान -रंजू मोडक

208

Chandrapur@city news

• मायाताई कोसरे -मेघा धोटे ह्या सहजं सुचलंची शान -रंजू मोडक

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि )

चंद्रपुर : महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे (नागपूर) व मेघाताई धोटे (राजूरा)ह्या सहजं सुचलं महिला गृपची शान असून या गोड जोडीने नेहमीच सदस्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.

या शिवाय व्यासपीठावरील जेष्ठ लेखिका व कवयित्रीं ह्या नवोदित कवयित्रींना सदैव प्रेरणादायी ठरत असल्याचे मत चंद्रपूरातील सामाजिक महिला कार्यकर्त्या रंजू दिलीप मोडक यांनी आज शुक्रवारी बोलताना या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले‌.
त्या शहरातील एका कार्यक्रमात आल्यावर एका भेटी दरम्यान बोलत होत्या . या गृपवर अगोदर १५ते २०महिला सदस्या होत्या. कालांतराने ती संख्या वाढत गेली.

आजच्या घडीला या सर्व गृपवर १८००महिला व तरुणी सदस्या आहेत .याची मला कल्पना असल्याचे पुढे म्हणाल्या.
सहज सुचलं हा गृप दहा भागात विभागला गेला असून महाराष्ट्रातील नामवंत जेष्ठ साहित्यिका विजया भांगे (पथ्रोड )जागतिक पुरस्कार विजेती कवयित्री कु.अर्चना सुतार (पाचवड )सुपरिचित पुरस्कार प्राप्त मेकअप आर्टिस्ट कु.कल्याणी सरोदे (कन्हान कान्द्री नागपूर)क्रीडापटू कु.सायली टोपकर,अतिदुर्गम भागातील गडचिरोलीच्या प्रख्यात मेकअप आर्टिस्ट शितल मेश्राम,बालकथाकार जेष्ठ लेखिका विजया तत्वादी (हैद्राबाद )यांचा या महिला गृपवर समावेश आहे.

या शिवाय जेष्ठ साहित्यिका स्मिता बांडगे( मूल )डॉ.स्मिता मेहेत्रे (नागपूर)भावना खोब्रागडे (सिंदेवाही )सरोज हिवरे (राजूरा )रजनी पोयाम( वणी )वंदना बोढे( वरोरा )वर्षा शेंडे (चिमूर )व नवोदित प्रगती खोब्रागडे( नागपूर ) मुग्धा खांडे(चंद्रपूर) ह्या सहज सुचलंवर गेल्या अनेक वर्षांपासून सदस्या आहेत . गत आठ वर्षांपूर्वी सहजं सुचलंची संकल्पना ही वर्धा जिल्ह्यातील वरुड या गावच्या अभियंता कु.रितू लोहकरे यांची असून या गृपच्या मुख्य संयोजिका प्रतिभा पोहनकर या आहे.येत्या १जानेवारीला सहज सुचलं गृप आपली आठ वर्ष पूर्ण करुन यशस्वीपणे नवव्या पदार्पण करीत आहे.हे विशेष!